म. टा. प्रतिनिधी, नागपूर अभ्यास असो की सुलेखन, विजयश्रीला अनेक गोष्टींमध्ये रस होता, आणि मुख्य म्हणजे गतीही. ती दहावीत उत्तम गुण मिळवणार, याचा सगळ्या शिक्षकांना आणि पूर्ण शाळेला विश्वास होता. तिने तो सार्थ ठरवला. विजयश्री म्हणजे खऱ्या अर्थाने ऑलराउंडर मुलगी आहे, अशा शब्दांमध्ये तपोवन हायस्कूलच्या शिक्षकांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून विजयश्री तिच्या शाळेतून पहिली आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट