Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

२० हजार नागरिकांचा राज्याशी संपर्क तुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात भामरागडला राज्याशी जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पूल शुक्रवारी पाण्याखाली आल्याने तब्बल सहा तास भामरागड तालुक्यातील सुमारे २० हजार लोकांचा राज्याशी संपर्क तुटला होता. ही १२०पैकी ७० गावांतील लोकसंख्या आहे. पूर ओसरल्यानंतरही भामरागड तालुक्याचा वीजपुरवठा खंडीत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

भामरागड तालुक्यासह गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिवसभर पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहात होते. परिणामी सायंकाळपासून पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी भामरागड-हेमलकसादरम्यानचा पूल पुराच्या पाण्यात बुडाला. त्यामुळे भामरागडचा राज्याशी संपर्क तुटला. पण, दुपारनंतर पूर ओसरल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली. पूर ओसरल्यानंतरही समस्या कायम आहेत. या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही भामरागडवासीयांना अंधारात जीवन काढावे लागले. मोबाइल सेवा बंद पडली असून ब्रॉडबँडची सेवा तीन दिवसांपासून बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>