Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

भुते खटल्यात परत तारीख

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

वासनकर प्रकरणामध्ये अविनाश भुते याने स्वत:हून पैसे भरण्याची तयारी दर्शविल्यामुळेच त्याचा जामीन मंजूर झाला. मात्र, दिलेल्या आश्वासनावर कायम न राहता भुते याने 'यू टर्न' घेतला आहे. आपल्याला चुकीचा विधी सल्ला मिळाला म्हणून आपण तसे शपथपत्र दिले, त्यामुळे आपल्याला शिथिलता देण्यात यावी, असा अर्ज भुते यांनी विशेष एमपीआयडी कोर्टापुढे केला आहे. काही तांत्रिक कारणामुळे या खटल्याची सुनावणी परत एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

वासनकर वेल्थ मॅनेजमेंटप्रकरणी आपल्या जामिनातील अटी शिथिल कराव्यात, असा अर्ज ताजश्री समूहाचा प्रमुख अविनाश रमेश भुते याने न्यायालयात दाखल केला आहे. भुते याने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जासोबत आयकर संबंधातील काही दस्तऐवज दाखल केले होते. परंतु, संशय आल्याने सरकारी पक्षाने या दस्तऐवजांची पडताळणी केली आहे. आपण वासनकरमध्ये पैसे गुंतविले होते, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, ही सत्य परिस्थिती असल्याचे दिसून येत नाही. तसेच त्यांनी स्वतःच कोर्टासमोर मान्य केलेल्या अटीतून शिथिलता देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

यावर शनिवारी सुनावणी होणे अपेक्षित होते. परंतु काही कारणांमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातून आपल्याविरुद्ध असलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती ताजश्री समूहाचा संचालक अविनाश रमेश भुते याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे. याप्रकरणी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई आणि अतुल चांदूरकर यांनी शासनाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, या कालावधीत भुते याच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, असा अंतरिम आदेशही दिला होता, हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>