Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ अन् नाना पाटेकर माझ्या पाया पडला : मनोहर

$
0
0

manjusha.joshi @timesgroup.com

'जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात झालं होतं, त्यावेळची गोष्ट आहे. नाना पाटेकर यांची प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ मुलाखत घेत होते. गाडगीळांनी श्रोत्यांमधून 'कोणीतरी नानांना प्रश्न विचारावा', असं आवाहन केलं. मी उठून उभा राहिलो. कवी ग्रेस आणि नाना पाटेकर यांच्यादरम्यान झालेल्या भेटीचा उल्लेख करत नानाला आईसंदर्भात काहीतरी प्रश्न विचारला. नानाने तो ऐकला आणि भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही व्यक्ती कोण आहे, त्यांना मला भेटण्याची इच्छा आहे, असं म्हणत नानानं मला स्टेजवर बोलावलं. मी त्याच्यासमोर जाताच त्यानं मला घट्ट मिठी मारली आणि चक्क पाया पडला. मला काही सुचलंच नाही. मी ओशाळलो. ज्या व्यक्तीच्या पाया पडायला पाहिजे, तो नाना माझ्या पाया पडत होता. मी कृतकृत्य झालो होतो. सभागृहात टाळ्यांचा आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाचा पाऊस पडत होता...', नाना पाटेकरांचे मित्र उल्हास मनोहर यांनी त्यावेळची ती हृद्य आठवण सांगितली.

उल्हास मनोहर हे नाना पाटेकर यांचे खूप चांगले मित्र आहेत. सीताबर्डीवरील धनवटे रंगमंदिराच्या त्या सुवर्णकाळात उल्हास मनोहर आणि नाना पाटेकर यांची पहिल्यांदा 'पुरुष' या नाटकादरम्यान भेट झाली होती. त्यानंतर हे दोघे वारंवार भेटत राहिले. अशाच एक भेटीत मनोहर नानाला कवी ग्रेस यांच्याकडे घेऊन गेले होते. 'आई' कवितेला जन्माला घालणाऱ्या कवी ग्रेस यांना समोर बघताच नाना त्यांच्या थेट गळ्यात पडले होते आणि नंतर दोघेही त्यावेळी घळाघळा रडले होते. याच प्रसंगाची आठवण मुलाखतीदरम्यान उल्हास मनोहर यांनी नानाला करून दिली हेती.

नाना खूप रागीट आहे, त्याच्याशी बोलायला लोक घाबरतात, असं बोललं जातं. पण, उल्हास मनोहर यांचा अनुभव खूप वेगळा आहे. नाना रागीट आहे तो चित्रपटात. पण, प्रत्यक्षात तो सच्चा माणूस आहे. तो अतिशय संवेदनशील आहे. मित्रांना जीव लावणारा आहे, असं उल्हास मनोहर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>