Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दारूसाठी चिरला युवकाचा गळा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जगदीश भगवान काकडे (वय ४०) याने बबलू शंकर गिरडे (वय २०, रा. प्रतापनगर सोसायटी) या युवकाचा कैचीने गळा चिरून ‌त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जगदीश याला अटक केली. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी सोनेगाव चौकात घडली.

जगदीश याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी परिसरातील नागरिकांना दारू पिण्यासाठी पैसे मागतो. रविवारी सायंकाळी बबलू हा सोनेगाव चौकात उभा असताना जगदीश त्याच्याजवळ आला. त्याने जगदीशला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, बबलू याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन जगदीशने बबलू याच्या गळ्यावर कैचीने वार केले व पसार झाला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना तत्काळ सोनेगाव चौकात रवाना केले. माहिती मिळताच शिपाई मनीष पलेरिया व कृष्णा जाधव तेथे पोहोचले. जखमीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. पोलिसांनी जगदीश याचा शोध सुरू केला आहे. जगदीश हा खामला भागात असल्याचे कळताच पोलिस तेथे पोहोचले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जगदीश याला पकडले.

गळा चिरून हत्या

कोराडीतील लोणारा भागात गळा चिरून ६५ वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कोराडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, डुमन लक्ष्मण गजभे असे मृताचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>