Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

कर्जाला कंटाळून कुटुंबाचे विषप्राशन

$
0
0



म.टा. प्रतिनिधी, बुलडाणा

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुष्काळग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील मालठाणा गावात कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला. मसाने यांच्या कुटुंबातील चार जणांनी बुधवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. यातील दोघांचा घरी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण यातून बचावला असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे सिध्द झाले आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्याग्रस्त अशी ओळख चिकटलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात हे गाव येते. संग्रामपूर हा आदिवासीबहूल तालुका आहे. त्यात मालठाणा हे पूर्ण आदिवासी गाव आहे. गावाची लोकसंख्या २५० च्या सुमारास आहे. येथील रहिवासी नानसिंग सितु मसाने (वय ७०) यांच्या मालकीची गाव शिवारात दोन एकर शेती आहे. तर त्यांची सून लक्ष्मीबाई भावसिंग मसाने (४०) यांच्या नावाने दोन एकर शेती आहे. लक्ष्मीबाईचा पती भावसिंग यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.

मसाने कुटुंबात सासरे नानसिंग, सून लक्ष्मीबाई, नातू सुरेश (वय १७) व नानसिंग यांचा मुलगा व लक्ष्मीबाई यांचा दिर दिनेश (३५) हे राहात होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकत नव्हती. शेतीकरिता या कुटुंबीयांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. विहिरीसाठी घेतलेल्या कर्जाचाही यात समावेश होता अशी माहिती आहे. शिवाय नातेवाईकांकडून घेतलेली उसनवार वेगळी होती. दुष्काळाची दाहकता आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतीतून उत्पन्न कमी निघाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेत सामूहिक आत्महत्येचा मार्ग या कुटुंबाने पत्करला. बुधवारी सर्वांनी सोबत जेवण घेतले. जेवणानंतर रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. दिनेश नानसिंग मसाने याची प्रकृती बिघडताच तो घराबाहेर आला असता ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी धावाधाव करून दिनेशसह त्याला व कुटुंबीयांना जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने लक्ष्मीबाई, त्यांचा मुलगा सुरेश व नानसिंग मसाने यांना खामगावला नेण्यात आले. मात्र तोवर लक्ष्मीबाई व सुरेश या मायलेकांचा व दिनेशचा मृत्यू झाला होता. नानसिंग मसाने यांना खामगाव येथून अत्यवस्थ अवस्थेत अकोला येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

कर्जाला कंटाळलो : नानसिंग मसाने

घटनेतून बचावलेल्या नानसिंग मसाने यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. कुटुंबाच्या नावे महाराष्ट्र बँकेचे एक लाख रूपयांचे कर्ज आहे. त्यासाठी त्यांना एक महिन्यापूर्वी नोटीस मिळाली होती. बँकेचे वसुली अधिकारी घरी येऊन गेले होते. कर्जाचा डोंगर वाढल्याने या विवंचनेत सर्वांनी विष घेतल्याचे मसाने यांनी जबाबात म्हटल्याचे ठाणेदार विजय पाटकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>