Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’ बदलणार!

$
0
0


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

वर्धा रोडपासून जयताळाकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाकांक्षी ऑरेंज सिटी स्ट्रिटच्या विकासासाठी गुंतवणूकदार मिळत नसल्याने वेगवेगळ्या टप्प्यात त्याचे विभाजन करून विकास करण्याचे संकेत आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऑरेंज सिटी स्ट्रीट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. तथापि, बाजारातील ​नाजूक स्थितीमुळे गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता वेगवेगळे क्लस्टर तयार करून शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून या क्षेत्राचा विकास करण्यात येईल. धंतोली, रामदासपेठ आदी भागातील हॉस्पिटल्स, घाऊक किराणा व्यापार आणि इतर घटकांसाठी क्लस्टर तयार करण्यात येतील. ४०० ते ५०० कोटी रुपयांचा एक टप्पा राहील. त्यातून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

आऊटर रिंग रोड १७०० कोटी

देशात सद्य:स्थितीत रोज २२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहेत. ४२ किलोमीटरपर्यंत हे प्रमाण नेण्याचे आमचे प्रयत्न आहे. सत्तेत आलो त्यावेळी हा वेग रोज दोन किलोमीटर होता. नागपुरातील आऊटर रिंग रोडचे १७०० कोटी रुपयांचे काम सुरू झाले आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे शहर म्हणून नागपूरची ओळख होईल, असा दावाही गडकरी यांनी केला.

रोजगाराची समस्या

नागपूर-विदर्भात रोजगाराची सर्वात मोठी समस्या आहे. रस्ते, मेट्रो, वीज पुरवठा सुरळीत होईल. आयआयआयटी, आयआयएमसारख्या संस्था आल्या. सुमारे २०० एकरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. ४-५ संस्थांशी चर्चा सुरू आहे. विदर्भातील तरुणांसाठी काही जागा राखीव ठेवाव्या आणि प्रवेश शुल्कात सवलत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या वातारणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

फ्लाइंग क्लब
फ्लाइंग क्लबचा नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे १५ कोटी रुपयांचे मागणी करण्यात आली. खासगी तत्त्वावर क्लबचा विकास करून हेलिकॉप्टरसह अन्य प्रशिक्षण देण्यात येईल. सी-प्लेन सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. एमआरओसाठी एअर इंडियाचा स्पाइस जेटसोबत करार झाला. एमआरओत महिन्याला २५ विमाने अपेक्षित आहेत. स्पाइस जेटचे सेंटरही सुरू होणार आहे. येत्या दोन-तीन आठवड्यात काम सुरू होईल. त्यामुळे नागरी वाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>