Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नागपूर दर्शनसाठी चार वर्षे थांबा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

पर्यटन हे प्रत्येकाला हवे असते. नोकरी, व्यवसाय सांभाळताना अनेकांकडे मात्र पर्यटनासाठी वेळच नसतो. पर्यटनाला जाताना नियोजन कसे करायचे इथपासून सुरुवात होते. पर्यटकांच्या या सर्व गरजांचा विचार करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन आराखड्यात खास सर्किट तयार करण्यात आले आहे. पुणे दर्शनप्रमाणे नागपूर दर्शन अशी बस सुरू करण्याचे प्रस्तावित असले तरी या दर्शनासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विदर्भाकडे पर्यटकांनी आकर्षित व्हावे यासाठी विशेष योजना आखण्यात येत आहे. कोराडीसाठीही १८७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोराडी महोत्सवाचे आयोजनही याचाच एक भाग आहे. विदर्भाकडे पर्यटक आकर्षित व्हावे यासाठी असे प्रयत्न सुरू असले तरी पुण्याप्रमाणे नागपुरात नागपूर दर्शन बस सुरू होण्याचे सध्या कुठलेही नियोजन नसल्याचे बावनकुळे म्हणाले. बस सुरू करून काय दाखवायचे हा प्रश्न आमच्यापुढे आहे. पर्यटक आकर्षितच होणार नसतील तर बसमध्ये कोण बसणार? अशा बसचा काहीच उपयोग होणार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी नागपूर दर्शन बस सुरू करण्यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले.

नियोजन पडले लांबणीवर

नागपूरसह विदर्भ डोळ्यासमोर ठेऊन हे सर्किट तयार करण्यात आले आहे. विदर्भाचा शोध, व्याघ्रपर्यटन आणि विदर्भातील अष्टविनायक या नावाने पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना यात आखण्यात आली आहे. नागपूर दर्शन म्हणून यासाठी एक दिवसांचा सफर घडविण्याची संकल्पना यात मांडण्यात आली आहे. ऐतिहासिक वैभव लाभलेल्या महाल भागात फेरफटका, नागपूर-नवेगावखैरी- रामटेक-रामसागर, नागपूर-मन्सर-रामटेक-रामसागर-नगरधन, नागपूर-कामठी-रामटेक, नागपूर-शिवकुंड-अंबाखोरी-मोगरकसा, नागपूर-यशोदानगर-हनुमानगड-टाकलघाट-बेला धरण, नागपूर-मौदा-धर्मापुरी-देवसुकळी, रामटेक-जपलेश्वर-सलई-मन्सर, नागपूर-अदासा-पारडशिंगा-जलालखेडा, रामटेक-मन्सर-टेकडी-नवेगाव-खेक्रानाला, नागपूर-रामटेक-रामसागर-नवेगाव या सर्किटनुसार आवडीच्या स्थळांना एका दिवसात भेट देण्यासाठी बस सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र हे नियोजन आता लांबणीवर पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>