पितृपक्ष पंधरवड्याच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसने केंद्र सरकारची घोषणा असलेल्या 'अच्छे दिन'ची तेरवी करून सरकारच्या धोरणाचा अभिनव निषेध केला.
मध्य नागपूर काँग्रेसच्यावतीने सेंट्रल एव्हेन्यूवरील चितारओळ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री अनीस अहमद यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनात सुरुवातीला उरी येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, डॉ. गजराज हटेवार, विठ्ठलराव कोंबाडे, जुल्फिकार भुट्टो, रिंकू जैन, दिनेश बानाबाकोडे, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, राजू महाजन, श्रीकांत ढोलके, प्रकाश बांते, सुकेश मिजे, फिरोज खान, लोकेश बरडिया, आशिष दीक्षित, रितेश सोनी उपस्थित होते.
दुपारी १२ वाजताचा मुहूर्त साधून तेरवीचा विधीवत कार्यक्रम सुरू झाला. अकरा पंडितांना मंत्रोच्चारात हा विधी सुरू केल्याने वातावरण बदललले. इतके नव्हे तर पिंडदानही करण्यात आले. तसेच, नेत्यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून संवेदना व्यक्त करण्यात आल्या. आंदोलनस्थळी गाय आणून पूजन करण्यात आले. यावेळी नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारचे धोरण, कार्यक्रम आणि एकंदरीत स्थितीवर जोरदार टीका केली.
आंदोलनात हसमुख सागलानी, मेहुल अडवानी, रामू मोटघरे, निजाम अंसारी, अशोका निखाडे, मनीष छल्लानी, प्रमोद शुक्ला, इरफान काजी, सुनील दहिकर, अरविंद चांडक, कृष्णा गोटाफोडे, दीनानाथ खरबीकर, राजेंद्र नंदनकर, संजोग येरणे, अंजना मडावी, रजनी राऊत, अशोक धापोडकर, रवी खंते, विजय पखाले आदी सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट