गडचिरोली ः छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पातागुडमच्या जंगलात घातपात घडविण्यासाठी माओवाद्यांनी लपविलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. सिरोंचा तालुक्यात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याला लागुन पातागुडम परिसर आहे. या अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांच्या हालचाली सुरु असतात. अलिकडेच पातागुडम येथे सीमेवरच पोलिस ठाणे बनविण्यात आल्याने माओवादविरोधी अभियानात पोलिसांना फायदा झाला आहे. दरम्यान पातागुडम लगतच्या पेंडलायाच्या जंगलात शस्त्रसाठा माओवाद्यांनी लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पातागुडम येथील पोलिस पथक आणि देचलीपेठा येथील पथकाने संयुक्त मोहीम राबवून जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली. यात चार भरमार बंदूकांसह १४ जीवंत काडतुसेही जप्त केली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट