Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

हॉकर्स झोन पुन्हा वांध्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मनपाने प्रस्तावित केलेल्या हॉकर्स झोनला आधी वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला होता आणि नागरिकांनी मोठया प्रमाणात हरकती घेतल्याने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दुसरी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती वाहतूक पोलिसांसोबत नागरीकांच्या आक्षेपांचा अभ्यास करून अहवाल देईल. वाहतूक पोलिसांनी प्रस्तावित ५० पैकी ४२ जागांबाबत हरकत घेतली होती. तर, सीताबर्डी व गांधीबाग येथे रहिवाशांनीही प्रस्तावित हॉकर्स झोनला कडाडून विरोध केला होता.

अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली शहर विक्रेत्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाजार विभागाकडे हॉकर्स झोनबाबत एकूण ४०० तक्रारी आल्याने मनपाची मोठी अडचण झाली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे केंद्र सरकारने देशातील सर्व मनपाला हॉकर्स झोन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर मनपाने हॉकर्स समन्वय समिती तयार केली. यात वाहतूक पोलिस प्रतिनिधी, हॉकर्सचे प्रतिनिधी आणि अशासकीय सदस्यांचा समावेश होता. ३१ जुलै रोजी या समितीची बैठक झाली. त्यानंतर १ ऑगस्टला हॉकर्स नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यासोबतच मनपाने शहरातील हॉकर्ससाठी ५० जागांची यादी तयार केली. या जागांसंबंधीत सूचना व हरकतीही मागविण्यात आल्या. या समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या जागांची यादी तयार करण्यात आली. या यादीला अंतिम रूप देण्यात आले. यातील आठ जागांवर आक्षेप आल्याने त्याला यातून वगळण्यात आले होते.

२१ ऑक्टोबर,२०१३ मध्ये राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकांना हॉकर्स झोन तयार करताना काही दिशानिर्देश देणारी अधिसूचना जारी केली. यानुसार वाहतूक पोलिस, नागरिक, हॉकर्सचे प्रति​निधींचा समावेश असणारी समिती तयार करण्यात आली. आता हॉकर्स नोंदणीकरीताही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केवळ ४५०० हॉकर्सचीच नोंदणी करण्यात आली आहे. तर, शहरात जवळपास हॉकर्सची संख्या ३६हजारांवर असल्याचा बाजार विभागाचा अंदाज आहे.शहरातील निवासी भागात हॉकर्स झोन प्रस्तावित केल्यानेच मोठया प्रमाणत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

सीताबर्डी व्यापारी संघटनेकडून आक्षेप घेणारे ६० पत्र मनपा प्रशासनाला देण्यात आले. यात सीताबर्डी मेन रोडला हॉकर्स झोन जाहीर करण्यास कडाडून विरोध करण्यात आला आहे. जुनी बुधवारी भागातील नागरिकांनीही तेथे प्रस्तावित हॉकर्स झोनला विरोध दर्शविला आहे. सीताबर्डीतील व्यापारी महासंघाप्रमाणेच गांधीबाग येथील नागरिकांनीही नंगा पुतला येथील प्रस्तावित हॉकर्स झोनला विरोध दर्शविला आहे. येथील रस्ते आधीच अरूंद असताना, हॉकर्स झोनमुळे अडचणीत भर पडेल अशी भूमिका मांडली आहे.

प्रस्तावित जागा

नेताजी मार्केट, सीताबर्डी, टेम्पल बाजार रोड, अपना भंडार, बुटी हॉस्पिटल, जुने मॉरीस कॉलेज, मेड‌िकल चौकाजवळ, पाचपावली फ्लायओव्हर, गड्डीगोदाम गोल बाजार, इतवारी नंगा पुतला, रविनगर चौक, ​त्रिमूर्तीनगर मटन मार्केट, जरीपटका पोलिस ठाण्यासमोर, कळमना बाजार, महाल बुधवार बाजार, तीन नल चौक, रामनगर, महाराजबाग चौक, प्रजापती चौक.

झोन स्थायी स्थायी जागेची परवानगी फिरणारे

झोन स्थायी स्थायी जागेची परवानगी फिरणारे
लक्ष्मीनगर २४० ४ ५१
धरमपेठ ५०४ २ ९
हनुमाननगर ४१३ १०८ ३३
धंतोली १०१८ ६ ५०
नेहरूनगर १८० ३ ८५
गांधीबाग ४५५ १६ १
सतरंजीपुरा १३४ १३ १९
लकडगंज ३१५ ६ २६
आसीनगर ९० ३९४ २०
मंगळवारी २४६ ९ ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>