Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दसऱ्याला मिळणार पावसाचा दिलासा!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नवरात्रोत्सवात गरब्याची धूम असते. पण, यंदा हे नवरात्र आणि गरबा पावसात ‌भिजला. आता नवरात्र संपताना दसऱ्याबाबत दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसाळी वातावरण सोमवारनंतर सरण्याचा अंदाज आहे.

ऑगस्ट महिन्यात दबून राहिलेला पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलका वाढला. त्यानंतर पुन्हा तो दबून राहिला. हा थांबलेला पाऊस आता ऑक्टोबरच्या पहिल्‍या आठवड्यात सक्रिय झाला आहे. त्यामुळे एरवी या काळात कोरडे असलेले वातावरण सध्या पावसाळी आर्द्रतायुक्त झाले आहे.

येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सहसा मान्सून विदर्भातून माघार घेत असतो. यंदा मात्र उत्तरेकडून सुरू होणारी मान्सूनची ही माघार अद्याप मध्यप्रदेशापर्यंतदेखील आलेली नाही. नागपूर आणि विदर्भात ८ ऑक्टोबरदरम्यान मान्सून पूर्णपणे माघारी फिरत असतो. यंदा तशी स्थिती नाही. आर्द्रतायुक्‍त वारे अद्यापही वाहत असल्‍यानेच पावसाळी वातावरण आहे. त्याचा परिणाम होऊन आठवडाभरापासून चांगला पाऊस पडत आहे. पण, तो आता सोमवारनंतर दूर सरू शकतो. सोमवार मात्र ५० टक्के भागात पाऊस पडेल. तर मंगळवारी वातावरण शुष्क राहून दसरा आनंदात जाऊ शकतो, अशी शक्‍यता आता निर्माण झाली आहे. पण, सोमवारी मात्र चांगला पाऊस पडल्यास दसऱ्याच्या दिवशीदेखील हलका पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दोन दिवसांत दिसणार ‘हेझ’

एरवी ऑक्टोबर महिन्यात पहाटे थंडावा व दिवसा ऊन असे वातावरण असते. यानंतर महिनाअखेरीस हलकी थंडी सुरू होते. यामुळे नवरात्रात हलका गारवा असतो. यंदा मात्र पावसामुळे दिवसभर उकाडा, सायंकाळी पाऊस व रात्री गारवा असे वातावरण तयार झाले आहे. यातूनच आता मंगळवारनंतर वातावरणात ‘हेझ’ निर्माण होऊन सकाळी वातावरण अंधूक होण्याचा अंदाज आहे. थंडीचे शुष्क वारे व आर्द्रतायुक्त पावसाळी वारे यांच्या मिश्रणाला धूळ चिकटली की हे ‘हेझ’ तयार होते. तसे वातावरण नागपुरात पुढील दोन ते तीन दिवसांत निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>