लष्कराला शिस्त लागण्यात कायदा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या कायद्याचे प्रशिक्षण देणारी 'लष्करी विधी संस्था' सोमवार, १६ मे रोजी २५ वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने कामठी येथील संस्था परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लष्करात कायदा आणि त्यानिमित्ताने असलेल्या शिस्तीला विशेष महत्त्व आहे. यावर लष्कराच्या जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जाते. या जेएजीमधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य लष्करी विधी संस्था अर्थात 'आयएमएल' करते. या आयएमएलची स्थापना तशी १९८५मध्ये आर्मी मुख्यालयात झाली. त्यानंतर १९८८मध्ये ती शिमला येथे स्थानांतरित झाली. मात्र, १९८९मध्ये कामठी छावणी परिसरात ही संस्था सुरू झाली. त्यानंतर आता मागील २५ वर्षात ही संस्था लष्करी कायदा प्रशिक्षणात 'सेंटर ऑफ एक्सलन्स'च्या दिशेने वाटचाल करीत आहे. केवळ आर्मीच नव्हे, तर लष्कराच्या तिन्ही दलांसह निमलष्करी दलांच्या अधिकाऱ्यांनादेखील येथे प्रशिक्षण दिले जाते.
विदेशातील लष्करी अधिकारीदेखील ज्ञानार्जनासाठी या संस्थेत येतात. अशी ही संस्था सोमवारी रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. या रौप्यमहोत्सवांतर्गत रविवारी बडा खानाचे आयोजन करण्यात आले होते. तर सोमवारी सकाळी १०.२० वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्य न्यायाधीश अर्जान कुमार सिकरी हे मुख्य अतिथी असतील. आयएमएलचे कमांडंट ब्रिगेेडियर विजय कुमार हेदेखील यावेळी उपस्थित असतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट