Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

बलात्कार पीडितांना शासनाचे मनोधैर्य

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

अत्याचारपीडित महिला, बालकांना पुन्हा आपल्या आयुष्यात जगण्याचा आधार मिळावा, ते या धक्क्यातून बाहेर निघावेत, यासाठी शासनाने सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेचा नागपूर जिल्ह्यातील १७४ महिला आणि बालकांना लाभ मिळाला. यासह २७ प्रकरणांत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले, मात्र निधी प्राप्त झाला नसल्याने त्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचे महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले.

महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. कायद्याने या गुन्हेगारांना शिक्षा मिळत असली तरी पीडितांचा काहीही दोष नसताना त्यांना मोठ्या वेदनेतून सामोरे जावे लागते. अनेकांचे आयुष्य या धक्क्यामुळे उद्ध्वस्थ होते. पीडितांनाही पुन्हा आपले आयुष्य नव्याने सुरू करता यावे. आयुष्यातील ही धक्का पचवून पुन्हा आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी शासनाने मनौधैर्य योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पीडित महिला आणि बालकांना बळ देण्याची मोहीम राबविली जात आहे.

१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१६ या काळात मनौधैर्य योजनेंतर्गत पोलिस विभागाकडून महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात २०१ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. यापैकी १७४ पीडित महिला आणि बालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यातील ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून सात प्रकरणे प्रलंबित आहेत. आर्थिक आधार मिळावा आणि नव्याने आयुष्य सुरू करता यावे यासाठी २१ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य देण्यात येते. लैंगिक अत्याचार पीडित बालकांना किमान २ लाख आणि अधिकाधिक ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. बलात्कार पीडितेलाही २ ते ३ लाखांच्या दरम्यान मदत केली जाते. अॅसिड हल्ल्यात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ३ लाख रुपये आणि जखमी झाल्यास ५० हजार रुपये अनुदान दिले जात असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना कळविण्यात आले.

३ कोटी ६० लाखांची मदत

१ जानेवारी २०१४ पासून ते ३१ मार्च २०१४ या काळात ११ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या काळात ८६ लाख, १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या काळात २ कोटी १६ लाख, १ एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१६ या काळात ४७ लाख अशी एकूण ३ कोटी ६० लाखांची मदत नागपूर जिल्ह्यातील पीडितांना करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>