Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नेहमी मित्रच जोडले : अटलबहादूर

$
0
0


म.टा.प्रतिनिधी, नागपूर
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (डब्लूआयएफए) माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा फूटबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष सरदार अटलबहादूर सिंग यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनतर्फे फूटबॉल व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मी नेहमीच मित्र जोडले, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सिव्हिल लाइन्समधील चिटणवीस सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अखिल भारतीय फूटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार समीर मेघे आणि माजी महापौर कुंदाताई विजयकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना अटलबहादूर म्हणाले, ‘अनेकजण मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही. मी नेहमी मित्र जोडण्यावर भर दिला. कदाचित मला कुणी शत्रूच नाही. मी ज्याप्रकारे क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा सत्कार केला तशाच प्रकारे माझाही कुणी सत्कार करेल, याचा मी कधी विचारही केला नव्हता.’

यावेळी त्यांनी कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात अटलबहादूर यांना यावेळी शाल-श्रीफळ आणि आकर्षक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गडकरी यांनी अटलबहादूर सिंग यांना चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करीत क्रीडा क्षेत्रात, विशेषत: फूटबॉलमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. नागपूरचे दोनदा महापौरपद भूषविणारे आणि प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराचे (२०१४) मानकरी सरदार अटलबहादूर सिंग यांनी डब्ल्यूआयएफए व जिल्हा फूटबॉल संघटनेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला डब्ल्यूआयएफएचे सचिव साउटर वाज, हेन्री मेनेजेस, जिल्हा फुटबॉल संघटनचे अध्यक्ष हरेश व्होरा, सचिव युजिन नॉर्बट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>