Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

एचआयव्ही बाधितांची सरासरी संख्या घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

जनजागृतीसोबतच सुरक्षित शारीरिक संबंधाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे शहरातील एचआयव्ही बाधितांची सरासरी संख्या घटली आहे. मेडिकलमधील एआरटी (अ‍ॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी) केंद्रावर नोंद झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येवरून ही माहिती समोर आली आहे. एआरटीत २०१२ मध्ये १३२९ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली. त्यात आता ३५४ रुग्णांची घट होऊन डिसेंबर २०१५ पर्यंत ही संख्या ९७५ वर आली. व्यापक जनजागृती व बाधित रुग्णांच्या समुपदेशनामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले जाते.

मेडिकलच्या एआरटी केंद्रावर सध्या आठ हजार रुग्ण उपचार घेत असून, त्यात पंधरा वषार्खालील मुलांची संख्या सहाशे आहे. एचआयव्ही पूर्णपणे बरा करण्यासाठी सध्यातरी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्याला प्रतिबंध करण्यासाठी वेळेवर उपचार घेऊन सकारात्मक जीवनशैलीला आत्मसात करणे गरजेचे आहे. खंड पडू न देता औषधीचे सेवन करणे तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांचे पालन केल्यास अनेक वर्षे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. मेडिकलमध्ये एआरटी केंद्र स्थापन होण्यास ११ वर्षांचा कालावधी झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एआरटी केंद्र सुरू करण्यात आले असून, रुग्णांच्या उपचाराची तसेच औषधीची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. एकूण एचआयव्हीबाधित रुग्ण आठ हजार असून त्यापैकी पंधराशे रुग्णांचा सीडीफोर चांगला असल्याने त्यांचा औषधोपचार बंद आहे. परंतु, त्यांचे महिन्याला समुपदेशन केले जाते. महिलांच्या तुलनेत एचआव्हीबाधित पुरुषांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>