![]()
सावली सोडली तर कोणतीच गोष्ट नेहमीकरिता आपल्यासोबत नसते, असे म्हटले जाते. परंतु, या सावलीनेही साथ सोडली तर? कल्पनाही करवत नाही ना! मात्र, असाच काहीसा अनुभव नागपूरकरांना गुरुवारी आला. दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास नागपूरकरांच्या सावलीने त्यांची साथ सोडली. ‘अरे, माझी सावली कुठे गेली’, असा प्रश्न काहींना पडला. हा वैज्ञानिक अनुभव विद्यार्थ्यांनी रामण विज्ञान केंद्रात अनुभवला आणि एन्जॉयही केला.