स्वतःच्या नावाचे स्पेलिंग करणे सोपे पण अश्वत्थामा, युधिष्ठिर, दृष्टद्युम्न किंवा कार्डिओपल्मोनरी, इलोकंस अशा शब्दांचे स्पेलिंग्स लिहा म्हटले तर...? एक क्षण का होईना पण पेन्सिल डोक्यावर घासावी लागते. एकदा का स्पेलिंग जुळले की ते जमल्याचा आनंदही तसाच मस्त असतो. अक्षरांशी आणि शब्दांशी खेळणारे 'स्पेलिंगचे सम्राट' शोधून काढण्यासाठी 'मटा'ने एका विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. मटा आणि पुण्याच्या डिफरंट स्ट्रोक एज्युकल्चरल अॅकेडमीच्यावतीने स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत चिटणवीस सेंटर येथे ही स्पर्धा घेतली जाईल. वर्ग ५ ते ७ आणि ८ ते १० या दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांमधील स्पेलिंग त्यांना विचारले जातील. पहिली फेरी ही लेखी स्वरूपाची असेल. यामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी दुसऱ्या फेरीत जातील. दुसऱ्या फेरीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत प्रवेश दिला जाईल. दुसरी व तिसरी फेरी तोंडी स्वरूपाची असेल. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात जाहीर केला जाईल.
असे असेल स्वरूप दुसऱ्या फेरीत प्रत्येक स्पर्धकाला तीन शब्दांचे स्पेलिंग विचारले जाईल. त्यापैकी दोन स्पेलिंगचे योग्य उत्तर देणारे स्पर्धक पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. परीक्षकाने उच्चारलेल्या शब्दाचे स्पेलिंग करावे लागेल. त्यासाठी स्पर्धकाला एका मिनिटाचा कालावधी दिला जाईल. विजेता निश्चित होईपर्यंत तिसरी फेरी सुरू राहील.
बक्षिसांची होणार लयलूट स्पर्धेच्या विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. लहान गटासाठी प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये, दुसरे पारितोषिक दोन हजार रुपये तर तृतीय पारितोषिक एक हजार रुपये राहील. मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक पाच हजार तर द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तीन हजार व दोन हजार रुपये इतके देण्यात येईल. 'मटा'च्या दोन्ही कार्यालयांत अर्ज दिल्यास ५० रुपये इतके प्रवेशशुल्क आकारले जाईल. तर इतर केंद्रांवर दिल्यास १०० रुपये शुल्क आकारले जाईल. स्पर्धेच्या नोंदणीसाठी येताना विद्यार्थ्यांनी दोन छायाचित्रे आणावीत. अधिक माहितीसाठी differentstrokeacademy@gmail.com या ई-मेल क्रमांकावर संपर्क साधता येईल. शाळा व क्लासेसनाही एकत्रित नोंदणी करता येईल.
अर्ज मिळण्याची ठिकाणे महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, वेस्ट हायकोर्ट रोड, टाइम्स स्क्वेअर, धरमपेठ महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, रामदासपेठ खमंग रेस्टॉरेंट, सिमेंट रोड, प्रतापनगर, सकाळी ८ ते ८ डॉ. प्रकाश भोंडे, २२९, टेंपल बझार रोड, केतकर हॉस्पिटल समोर, सीताबर्डी सकाळी ९ ते ६ निखिल अग्रवाल व कंपनी, १०७, विमल कॉम्प्लेक्स, घाट रोड, नागपूर वैशाली मेडिकल्स, कल्याणी अपार्टमेंट, चिंचभवन, वर्धा रोड चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट