ब्ल्यू फिल्म दाखवून एका ३२ वर्षीय नवविवाहितेशी पतीनेच अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना नागपुरातील हुडकेश्वर भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवविवाहितेच्या तक्रारीवरून ३५ वर्षीय पतीविरुद्ध अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चार महिन्यांपूर्वी या नवविवाहितचे एका ३५ वर्षीय तरुणासोबत लग्न झाले. लग्नानंतर त्याला घरजावाई म्हणून मानसन्मान दिला होता. परंतु जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असाच प्रकार मार्च महिन्यापासून पत्नीच्या वाट्याला आला. घरजावाई असलेल्या पतीनं रंग दाखवायला सुरुवात केली. रात्र होताच पत्नीवर अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी तो दबाव टाकायचा. तो पत्नीला बळजबरीनं ब्ल्यू फिल्म दाखवायचा व पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करायचा. रोज-रोज अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी पतीचा दबाव वाढत असल्याने तिनं या सर्व प्रकाराला कंटाळून हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.
नातेवाईकांनी मुलीच्या सांगण्यावरून पतीविरुद्ध हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी पतीविरुद्ध अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट