विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा आघाडी, अमरावती विभागच्यावतीने येत्या २६ जून रविवारी यवतमाळ येथे विदर्भवादी तरुण-तरुणींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात वेगळे विदर्भ राज्य का?, विदर्भ राज्याचे फायदे, विदर्भाचे अर्थशास्त्र, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, विदर्भातील कृषी अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांच्या समस्या आदी विषयावर विदर्भवादी नेते मार्गदर्शन करतील. माजी आमदार अॅड. वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे राम नेवले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विदर्भाचे अभ्यास नितीन रोंघे, अॅड. नंदा पराते, संध्या इंगोले, युवा आघाडीचे अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रदीप धामणकर, सरचिटणीस निखिल गवळी, नागपूरचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे, जिल्हाध्यक्ष राहुल खारकर प्रमुख वक्ते राहणार आहेत.
दाते कॉलेज रोड, आरोग्यम हॉस्पिटल समोरील ज्योती मंगल कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा मेळावा होईल. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तरुणांनी काम करावे, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक तरुण, तरुणींनी मेळाव्यात सहभागी व्हावे, या दिशेने युवा आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी प्रदीप धामणकर (९५२७९०८५२६) किंवा राहुल खारकर (९५४५१७१३७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट