Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

चला शहर बदलवूया...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

हे शहर आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे त्याला समस्यांपासून दूर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक समस्येसाठी सरकार, महापालिका, स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरणे योग्य नाही. छोट्या छोट्या कृतीतूनही आपण या शहराचा चेहरा बदलवू शकतो. चला तर मग आजपासून त्याला सुरुवात करूयात, अशी साद 'सिटिझन रिपोर्टर'चे या आठवड्याचे मानकरी अभिषेक ब्राह्मणकर, आशिष वर्डेकर, अरुण मुक्तिबोध आणि सुस‌िम डोंगरे यांनी घातली.

'सिटिझन रिपोर्टर' या व्यासपीठावरून समस्या मांडणाऱ्या या संवेदनशील नागरिकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कौटुंबिक वातावरण झालेल्या या कार्यक्रमानंतर त्यांनी ही भावना बोलून दाखविली. वाचकांमधली संवेदनशीलता जागी करण्यासाठी 'मटा'ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन 'सिटिझन रिपोर्टर' हे अॅप्लिकेशन तयार केले. मोबाइलमध्ये हे अॅप डाउनलोड करून घेतल्यानंतर नागरिकांना आपल्या भागातील समस्या, जनमानसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त आहे. त्याचा लाभ घेत ब्राह्मणकर यांनी अंबाझरी लेआउट परिसरात फेकल्या जात असलेल्या मासोळ्यांवर प्रकाश टाकला. त्यामुळे या भागातील नागरिक कशा रितीने दुर्गंधीत जगत आहेत, ही बाब त्यांनी मांडली. तर खामला परिसरात अनेक पॅनकार्ड फेकून देण्यात आल्याचा प्रकार आशिष वर्डेकर यांनी उघडकीस आणला. इतक्या मोठ्या संख्येने पॅनकार्ड आले कुठून, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. प्रगती कॉम्प्लेक्समध्ये पाण्याची सुरू असलेली नासाडी, त्यामुळे होणारे नुकसान मांडत मुक्तिबोध यांनी जलसाठ्याचा असा अपव्यय करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची सूचनाही केली होती. काटोल रोड परिसरातील अनुपम सोसायटीत रस्त्यावरील गडरचे झाकण तुटलेले आहे. त्यामुळे या भागात अनेक दिवसांपासून दुर्गंधी पसरली आहे. गडरचे झाकण दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु, संबंधित यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, ही बाब डोंगरे यांनी निदर्शनास आणून दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>