रत्नाकर मतकरी लिखित या बालनाट्याचे दिग्दर्शन रंजन कला मंदिराचे कार्यवाह संजय पेंडसे यांनी केले आहे. या बालनाट्यातील मनीमांजरीची प्रमुख भूमिका अभिनेत्री राधिका देशपांडे साकारणार आहेत. 'होणार सून मी या घरची' मालिकेतील त्यांनी साकारलेली गीताची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. दोन तासांच्या या बालनाट्यात एकूण १५ कलावंतांचा सहभाग राहणार आहे. बाल रसिकांसाठी हे बालनाट्य मोफत राहणार आहे. नाटकाच्या प्रवेशिकांबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४४३२९५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट