Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

शेतकऱ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. पण, पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज केल्याने संताप व्यक्त होत आहे. यात पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. तर मोर्चातील शिवसैनिकांनी आमदारांच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीत मोठे नुकसान झाले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे व महागाव येथील परिवर्तन जण आंदोलन समितीने हा मोर्चा काढला होता. गेल्या तीन वर्षांपासून ५० पैशाच्या आत आणेवारी असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये द्यावे, २००८ ते २०१६दरम्यान कर्जाचे पुनर्गठन करावे यासह महागाव तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी, आदी मागण्या या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीतून हा मोर्चा निघाला. त्यावेळी सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी आमदाराच्या घरावर चला, असा आग्रह धरला. पण, इतर नेत्यांनी त्याला विरोध करून मोर्चा कार्यालयावर नेला. त्या ठिकाणी आमदार राजेंद्र नजरधने यांना मोर्चाच्यावतीने निवेदन ही देण्यात आले. यावेळी नेत्यांची भाषणे सुरू असतानाच शिवसैनिकांनी आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यामध्ये अडथळेही आणले. नंतर काही शिवसैनिकांनी आमदाराच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी मोर्चेकरांना हटविण्यासाठी लाठीचार्ज केला. यात भाजपचे सुरेश नरवाडे यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना नांदेडला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या महागावात तणावाचे वातावरण आहे. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>