Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दोन महिलांसह आवळे गँगवर मोक्का

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

तरुणींच्या हतबलेचा फायदा उचलून आणि त्यांना शस्त्रासारखे वापरून त्यांच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचा आरोप असलेल्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दीपक अनिल आवळे, दिनेश बालचंद ऊर्फ पानाचंद नागदेवे (४५), सुनीता किशोर बुलकर ऊर्फ सुनीता दीपक आवळे आणि पुष्पा उमाशंकर निखारे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यंदा मोक्कांतर्गत ही सोळावी कारवाई असून, अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच महिलांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 'मटा'ने सर्वप्रथम या गँगविरुद्ध वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ खोब्रागडे (३८, रा. मैत्रीनगर) हे रेल्वेत लिपिक या पदावर कार्यरत आहेत. त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी आरोपींनी एका २० वर्षीय तरुणीची मदत घेतली. तरुणीला उच्चशिक्षणासाठी २० हजारांची आवश्यकता होती. त्याचा फायदा आवळे टोळीने घेतला. १७ मार्चला या तरुणीने सिद्धार्थ यांना मानकापूर भागात टाउन परिसरात भेटायला बोलाविले. सिद्धार्थ मानकापूर येथे गेले. तरुणीने आवळेच्या सांगण्यानुसार सिद्धार्थ यांना जाळ्यात अडकविले. त्यानंतर २० मार्चला तरुणीचा वाढदिवस असल्याचे‌ सिद्धार्थ यांना सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे आवळे व तरुणीने नवा नकाशा भागात खोली भाड्याने घेतली. काही वेळाताच आवळे व त्याचे साथीदार खोलीत घुसले. 'तू आमच्या मुलीवर अत्याचार करीत आहे, तुला धडा शिकवतो, पोलिसांत तक्रार दाखल करतो', अशी धमकी देत आवळेने सिद्धार्थ यांना मारहाण केली. सिद्धार्थ यांच्या एटीएममधून ७० हजार रुपये काढले. तसेच त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा चेक स्वाक्षरी करून घेतला आणि तो वटवला. याप्रकरणी सिद्धार्थ यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित तरुणीला समोर आणल्यावर तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोपींनी आपली पोळी शेकल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एन. भटकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश‌ दिले. पोलिसांनी ‌दोन महिलांसह तिघांना अटक केली. दीपक अद्याप पसार आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त संजय बलकवडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>