Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

उघडली शाळांची दारे; किलबिल सुरू

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतर विदर्भातील शाळांची दारे विद्यार्थ्यांसाठी सोमवारी खुली झाली. हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळांच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी सोमवारी शाळांमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन सर्वच ठिकाणी करण्यात आले होते. नवे गणवेश आणि नव्या दप्तरांसह शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले.

शहरातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पारंपारिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागतही अनेक शाळांनी केले. सरस्वती पूजनासारख्या कार्यक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात आले होते. ‌प्रत्येक शाळेने आपापल्या स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले. काही शाळांनी आज पहिल्या दिवशी काही तास घेऊन किंवा अर्धा दिवस शाळा घेऊन विद्यार्थ्यांनी सुटी दिली.

नागपूर महापालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये शैक्षणिक प्रदर्शन, लघुनाट्ये, सादरीकरणे, कथाकथन व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्याचेदेखील वाटप माहापालिका शाळांमध्ये करण्यात आले. महापालिकेचे विविध पदाधिकारी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

जि.प. शाळांमध्ये प्रवेशद‌िंडी

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होण्यापूर्वी गावांमध्ये प्रभातफेरी, प्रवेशदिंडी यांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिले जावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे, पुस्तके, जोडे, मोजे इत्यादी शैक्षणिक साहित्यदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आले.



शिक्षकांची पूर्वतयारी

प्रवेशोत्सवासाठी शाळांमध्ये दोन दिवस अगोदरपासून तयारी करण्यात आली होती. रविवारीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली होती. शाळांमधील दुरुस्ती, रंगरंगोटी, प्रवेशोत्सवाची तयारी इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षक सुटीच्या दिवशी देखील हजर होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी ८० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नोंदविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>