Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

अकोला, अमरावतीत क्षोभ

$
0
0

अकोला, अमरावतीत क्षोभ

टीम मटा
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणाचे पडसाद सोमवारी यवतमाळ जिल्ह्यासह अकोला आणि अमरावती जिल्ह्यातही उमटले. मोर्चे, निदर्शने आणि निवेदनाच्या माध्यमातून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. अमरावतीत भाजपने तर अकोल्यात जिजाऊ ब्रिगेडने आंदोलन केले. शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आज, मंगळवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

भाजपकडून निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : वायपीएस प्रकरणावरून यवतमाळ तीन दिवसांपासून धूमसत असतानाच सोमवारी अमरावती येथे भाजपचे कार्यकत्यांनी आंदोलन केले. राजकमल चौकात निर्दशने करून घटनेचा निषेध नोंदविला. भाजयुमोचे शहराध्यक्ष विवेक कलोती, महासचिव चेतन गावंडे, सतीश करेसिया, महिला मोर्चा प्रमुख रिता मोकळकर, सचिव अनिरूद्ध लढ्ढा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रकरणाचा निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या. घटनेच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे राजकमल चौक येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यानंतर आंदोलकांनी जिल्हा कचेरीवर पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.


शाळेची मान्यता रद्द करा

अकोल्यातही दर्डा यांच्या शाळेची मान्यता रद्द करावी यासाठी जि‌जाऊ ब्रिगेडने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत घटनेचा निषेध नोंदविला.

यवतमाळ जिल्ह्यात मोर्चे

वायपीएसमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या निषेधात सोमवारी घाटंजी, दिग्रस, आर्णी, राळेगाव, उमरखेडसह इतरही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

महानिरीक्षकांसोबतच पालकांची बैठक

अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांच्या उपस्थितीत सोमवारी पोलिस मुख्यालयात पालकांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी पालकांनी वायपीएसबद्दल अनेक तक्रारी केल्या. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत हलगर्जीपणा दाखविल्याचा आरोप काही पा‌लकांनी केला. त्यावर सिंघल यांनी वायपीएसप्रकरणी पोलिस योग्य प्रकारे चौकशी करीत असून त्यासाठी एसआयटी बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शाळेवर नियंत्रक नियुक्त

शासनाकडून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची शाळेवर नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारापासून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यस्तरीय समितीने ही शाळा आज, मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथील शिक्षण उपसंचालक एस. बी. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये सर्व शिक्षकांसह चर्चा केली. यात मंगळवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुळकर्णी यांनी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा दिली. तसेच येत्या काळात अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी सतर्क राहून आत्मविश्वासाने कार्य करण्यास सांगितले. पालकांनी कोणतीही भीती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठविण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यवतमाळ येथील वायपीएसमध्ये संस्थेत घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यावर यवतमाळच्या पोलिस अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्यासंदर्भात सांगितले होते. पण, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच यवतमाळकरांचा उद्रेक झाला. आता तर चार ते पाच वर्षांपूर्वी पास झालेल्या विद्यार्थिनींनीही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे संस्थेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>