राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्र सुरू होताच हिवाळी परीक्षेचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे. त्यात तब्बल १५ दिवसांनी परीक्षा लवकर घेण्यात येत असल्याने परीक्षांचे निकालदेखील लवकर जाहीर करण्याची सोय केली आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ऑक्टोबरला हिवाळी परीक्षा सुरू होणार आहे. त्या पहिल्या टप्प्यात १८० परीक्षा घेण्यात येणार असून त्यात मागील सेमिस्टरमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना संधी राहणार आहे. तर १९ ऑक्टोबरपासून दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यात ८८ परीक्षा होणार असून त्यात वार्षिक परीक्षा पद्धतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपासून पहिल्या नियमित सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. त्या टप्प्यात ८१ परीक्षा घेण्यात येतील. तसेच २९ नोव्हेंबरपासून चौथा टप्पा सुरू होत असून त्यात ३७४ परीक्षा होणार आहेत. त्या परीक्षादेखील नियमित सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या राहणार आहेत. या वेळापत्रकात विद्यापीठाने १५ दिवसांच्या कालावधीची बचत केली आहे. त्यामुळे निकालदेखील लवकर जाहीर होणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट