Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

१२ दिवसांनंतर शुद्ध पाणी

$
0
0

उज्ज्वल भोयर, नागपूर

सावरगावात १३ दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली. साडेसातशेहून अधिक रुग्णांची नोंद होऊन तिघांचा बळी गेला. दूषित पाण्यातून ही साथ पसरल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. प्रशासनाने पाणीपुरवठा बंद केला. पर्यायी व्यवस्था नसल्याने शुद्ध पाण्यासाठी १२ दिवस गावातील प्रत्येकजण भटकत होता. टँकर येईल म्हणून आस लावून बसला होता. सोमवारी ही मागणी पूर्ण झाली. गावात दोन टँकर आले. पण, साध्या पाण्यासाठी इतके दिवस का वाट पाहावी लागली, मरणाच्या दारात असतानाही नेत्यांची तत्परता का दिसली नाही, असा संताप गावातील प्रत्येक जण मंगळवारी व्यक्त करीत होता. व्यवस्थेविषयीचा रोष मांडत होता.

नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली आहे. पण, गावकऱ्यांच्या मनातील दहशत अजूनही कायम आहे. सुरेश नामदेव बागडे (२६), वैष्णवी रंजित वंजारी (११) व मैनाबाई ढोबळे (७५) यांच्या मृत्यूचे दु:ख गावात पावलोपावली जाणवते. मुळात गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब गावकऱ्यांना आधीच लक्षात आली होती. त्याचे वास्तव तक्रारींच्या माध्यामातून मांडण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर गावात साथ पसरल्यानंतरही आरोग्य प्रशासनाने तत्परता दाखविली नाही. गावात रुग्णांची मोठी संख्या असतानाही वरिष्ठांना माहिती कळविण्यात आली नाही. परिणामी रुग्णांना नागपूर किंवा काटोलला हलविण्यात दिरंगाई झाली. जीव गेले, असा आरोपही गावकरी करीत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने गावात राबविलेले स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरतेचे होते. कारण गावात पाण्यामुळे आजार पसरल्याने त्याची सोय आधी करणे अपेक्षित होते. पण, त्याकडेच दुर्लक्ष करण्यात आल्याचेही गावकरी सांगत आहेत.

विनातिकीट प्रवास करीत गाव गाठले

सावरगावातील प्रत्येक घरात रुग्ण होते. एकमेकांना आधार देण्यापुरतेही लोक उरले नाही. नातेवाइकांना बोलविण्यात आले. पण, हंगामाची वेळ असल्याने अनेकांना हा आधारही मिळाला नाही. गावात असलेल्यांचे निभावले. पण, नागपुरात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. अनेकांकडे पैसे नसल्याने अडचण झाली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अनेकांनी रेल्वेने फुकट प्रवास करावा लागल्याची व्यथाही गावकरी मांडत आहेत.

डॉक्टरांवर व्हावी कारवाई

दूषित पाणीपुरवठ्यासाठी ग्रामसेवक समाधान वानखेडे यांना दोषी ठरवित त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण, आरोग्य विभागही यात दोषी आहे. म्हणून डॉक्टरांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्यांना नागपुरातील मेडिकलमध्ये तर काहींना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ आजारी असलेल्यांवर सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी जागा अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत व समाज मंदिरात अस्थायी रुग्णालय उघडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा नागपूर गृहजिल्हा असून पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. यासाठी सावरगाव येथील गॅस्ट्रो तातडीने आटोक्यात आणा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तीन विभागांच्या प्रधान सचिवांनी दिल्या होत्या. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अख्खी जिल्हा परिषदेची यंत्रणा सावरगाव येथे तळ ठोकून होती. तर इतर गावांमध्येही बिकट परिस्थिती असताना दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप होत आहे.

नरखेड तालुक्यात सावरगाव आहे. येत्या काळात काही मातब्बर नेत्यांना या भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे. त्यामुळे सावरगाव येथील गॅस्ट्रो प्रतिष्ठेचा विषय झाला. तीन दिवस सीईओ एका गावात पूर्ण यंत्रणा घेऊन जात असल्याने सर्वत्र ‌चर्चा सुरू झाली. सावरगाव हे आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. मुख्यमंत्री, वजनदार केंद्रीय मंत्रीही नागपूर जिल्ह्याचे आहेत. येत्या काळात पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. तर तिकडे हिवाळी अधिवेशनही आहे. त्यामुळे तातडीने अख्खी यंत्रणा कामी लावा, पण तेथील गॅस्ट्रोला आवरा, अशा स्पष्ट सूचना तीन प्रधान सचिवांनी सीईओंना दिल्या. यात आरोग्य विभाग, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष फोनवरून 'अपडेट' घेऊन सावरगाववर लक्ष केंद्रित केले होते. परिणामी, पूर्ण यंत्रणेने सावरगाव गाठून तेथे साफसफाई मोहीम राबविली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. याचे श्रेय जिल्हा परिषदेला जाते. मात्र, गॅस्ट्रोसारखा आजार कधीही थैमान घालू शकतो, याची जाणीव सर्वांनाच होती. यात मेडिक्लोर, ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यास राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे ‌विलंब झाला. केवळ सावरगाववर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे एवढे प्रेम का, असा सवाल उपस्थित झाला होता. अखेर यावरील चर्चेला पूर्णविराम ‌मिळाला आहे.

सावरगावसारख्या तत्परतेची प्रतीक्षा

सावरगावमध्येच गॅस्ट्रो आहे, असे नाही. तर, जिल्ह्यातील उर्वरित गावांमध्येही गॅस्ट्रोची लागण आहे. २१ गावे तर डेंजर झोनमध्ये आहेत. २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळलेल्या गावांमध्ये हा धोका जास्त आहे. प्रामुख्याने रामटेक तालुक्यातील भिलेवाडा, खमारी या दोन गावांत कमी क्लोरीन आढळले आहे. कुही तालुक्यातील मसली, हरदोली, चन्ना, सालवा, नरखेड तालुक्यातील पिठोरी, बानोर, मोहदी या गावात कमी क्लोरीन आहे. भिवापूर तालुक्यातील पांजरीपार, गाडेघाट, हिंगणा तालुक्यातील डेगमा, काटोल तालुक्यातील मसली, मेहखेडी, बोरी या गावात, पा‌रशिवनी तालुक्यातील इटगाव, दवणा, वाघेडा, बखारी, खंडाळा, कोलीतमारा या गावांचा समावेश आहे. पारशिवनी तालुका सर्वाधिक प्रभावित असल्याची माहिती आहे. या गावांमध्येही जिल्हा परिषदेने मोहीम राबवून गॅस्ट्रोवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरत आहे. भोयर, नागपूर

सावरगावात १३ दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली. साडेसातशेहून अधिक रुग्णांची नोंद होऊन तिघांचा बळी गेला. दूषित पाण्यातून ही साथ पसरल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. प्रशासनाने पाणीपुरवठा बंद केला. पर्यायी व्यवस्था नसल्याने शुद्ध पाण्यासाठी १२ दिवस गावातील प्रत्येकजण भटकत होता. टँकर येईल म्हणून आस लावून बसला होता. सोमवारी ही मागणी पूर्ण झाली. गावात दोन टँकर आले. पण, साध्या पाण्यासाठी इतके दिवस का वाट पाहावी लागली, मरणाच्या दारात असतानाही नेत्यांची तत्परता का दिसली नाही, असा संताप गावातील प्रत्येक जण मंगळवारी व्यक्त करीत होता. व्यवस्थेविषयीचा रोष मांडत होता.

नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली आहे. पण, गावकऱ्यांच्या मनातील दहशत अजूनही कायम आहे. सुरेश नामदेव बागडे (२६), वैष्णवी रंजित वंजारी (११) व मैनाबाई ढोबळे (७५) यांच्या मृत्यूचे दु:ख गावात पावलोपावली जाणवते. मुळात गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब गावकऱ्यांना आधीच लक्षात आली होती. त्याचे वास्तव तक्रारींच्या माध्यामातून मांडण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर गावात साथ पसरल्यानंतरही आरोग्य प्रशासनाने तत्परता दाखविली नाही. गावात रुग्णांची मोठी संख्या असतानाही वरिष्ठांना माहिती कळविण्यात आली नाही. परिणामी रुग्णांना नागपूर किंवा काटोलला हलविण्यात दिरंगाई झाली. जीव गेले, असा आरोपही गावकरी करीत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने गावात राबविलेले स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरतेचे होते. कारण गावात पाण्यामुळे आजार पसरल्याने त्याची सोय आधी करणे अपेक्षित होते. पण, त्याकडेच दुर्लक्ष करण्यात आल्याचेही गावकरी सांगत आहेत.

विनातिकीट प्रवास करीत गाव गाठले

सावरगावातील प्रत्येक घरात रुग्ण होते. एकमेकांना आधार देण्यापुरतेही लोक उरले नाही. नातेवाइकांना बोलविण्यात आले. पण, हंगामाची वेळ असल्याने अनेकांना हा आधारही मिळाला नाही. गावात असलेल्यांचे निभावले. पण, नागपुरात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. अनेकांकडे पैसे नसल्याने अडचण झाली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अनेकांनी रेल्वेने फुकट प्रवास करावा लागल्याची व्यथाही गावकरी मांडत आहेत.

डॉक्टरांवर व्हावी कारवाई

दूषित पाणीपुरवठ्यासाठी ग्रामसेवक समाधान वानखेडे यांना दोषी ठरवित त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण, आरोग्य विभागही यात दोषी आहे. म्हणून डॉक्टरांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्यांना नागपुरातील मेडिकलमध्ये तर काहींना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ आजारी असलेल्यांवर सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी जागा अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत व समाज मंदिरात अस्थायी रुग्णालय उघडण्यात आले आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा नागपूर गृहजिल्हा असून पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. यासाठी सावरगाव येथील गॅस्ट्रो तातडीने आटोक्यात आणा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तीन विभागांच्या प्रधान सचिवांनी दिल्या होत्या. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अख्खी जिल्हा परिषदेची यंत्रणा सावरगाव येथे तळ ठोकून होती. तर इतर गावांमध्येही बिकट परिस्थिती असताना दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप होत आहे.

नरखेड तालुक्यात सावरगाव आहे. येत्या काळात काही मातब्बर नेत्यांना या भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे. त्यामुळे सावरगाव येथील गॅस्ट्रो प्रतिष्ठेचा विषय झाला. तीन दिवस सीईओ एका गावात पूर्ण यंत्रणा घेऊन जात असल्याने सर्वत्र ‌चर्चा सुरू झाली. सावरगाव हे आठ हजार लोकसंख्येचे गाव आहे. मुख्यमंत्री, वजनदार केंद्रीय मंत्रीही नागपूर जिल्ह्याचे आहेत. येत्या काळात पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. तर तिकडे हिवाळी अधिवेशनही आहे. त्यामुळे तातडीने अख्खी यंत्रणा कामी लावा, पण तेथील गॅस्ट्रोला आवरा, अशा स्पष्ट सूचना तीन प्रधान सचिवांनी सीईओंना दिल्या. यात आरोग्य विभाग, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष फोनवरून 'अपडेट' घेऊन सावरगाववर लक्ष केंद्रित केले होते. परिणामी, पूर्ण यंत्रणेने सावरगाव गाठून तेथे साफसफाई मोहीम राबविली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. याचे श्रेय जिल्हा परिषदेला जाते. मात्र, गॅस्ट्रोसारखा आजार कधीही थैमान घालू शकतो, याची जाणीव सर्वांनाच होती. यात मेडिक्लोर, ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यास राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे ‌विलंब झाला. केवळ सावरगाववर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे एवढे प्रेम का, असा सवाल उपस्थित झाला होता. अखेर यावरील चर्चेला पूर्णविराम ‌मिळाला आहे.

सावरगावसारख्या तत्परतेची प्रतीक्षा

सावरगावमध्येच गॅस्ट्रो आहे, असे नाही. तर, जिल्ह्यातील उर्वरित गावांमध्येही गॅस्ट्रोची लागण आहे. २१ गावे तर डेंजर झोनमध्ये आहेत. २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळलेल्या गावांमध्ये हा धोका जास्त आहे. प्रामुख्याने रामटेक तालुक्यातील भिलेवाडा, खमारी या दोन गावांत कमी क्लोरीन आढळले आहे. कुही तालुक्यातील मसली, हरदोली, चन्ना, सालवा, नरखेड तालुक्यातील पिठोरी, बानोर, मोहदी या गावात कमी क्लोरीन आहे. भिवापूर तालुक्यातील पांजरीपार, गाडेघाट, हिंगणा तालुक्यातील डेगमा, काटोल तालुक्यातील मसली, मेहखेडी, बोरी या गावात, पा‌रशिवनी तालुक्यातील इटगाव, दवणा, वाघेडा, बखारी, खंडाळा, कोलीतमारा या गावांचा समावेश आहे. पारशिवनी तालुका सर्वाधिक प्रभावित असल्याची माहिती आहे. या गावांमध्येही जिल्हा परिषदेने मोहीम राबवून गॅस्ट्रोवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>