बदलत्या हवामानामुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. पेंढारकर यांनी 'आहार आणि निरोगी आयुष्य' या विषयावर प्रकाश टाकला.
बदामात शरीराला पोषक असणारे व्हिटॅमिन ए, सी आणि फायबरसह २३ प्रकारचे सूक्ष्म कण असतात, असे नमूद करीत डॉ. पेंढारकर म्हणाल्या, 'रोज २३ अथवा ३० ग्राम बदामाचा आहार समावेश केला तर भूकही नियंत्रणात राहते. शिवाय शरीराला आवश्यक असलेले घटक थेट पोटात जातात. त्यामुळे चयापयचाची प्रक्रिया सुरळीत होते. यातून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आणणाऱ्या कोलेस्ट्रॉलची मात्राही नियंत्रणात राहते. शिवाय, वजनही आटोक्यात राहते. बदामात पेशी, स्नायू, हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे धातूदेखील असतात. शिवाय व्हिटॅमिन ई आणि अ ही जीवनसत्त्वेही त्यात असतात. दैनंदिन आहारात समाविष्ट करणारे २३ अथवा ३० ग्रॅम बदाम एकाचवेळी खायचे नाहीत. दोन जेवणांमध्ये काळात जर बदामाचा आहारात समावेश केला तर भूकही नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त मेद तयार होत नाही. हृदयरोगी, मधुमेहींसाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट