Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

दहन, रास्ता रोको अन् तणाव

$
0
0



म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याविषयी उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वापरलेल्या अपशब्दाचे पडसाद गुरुवारी नागपुरात उमटले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयामसमोर सिंह यांच्या पुतळ्याचे दहन करून भाजपविरोधी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती.

भाजपने दयाशंकर सिंह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर हकालपट्टी केली. त्यांनी माफी मागितली असली तरी, त्यावर बसपसह अन्य राजकीय पक्षांचे समाधान झालेले नाही. सिंह यांना दलितविरोधी अत्याचार कायद्यान्वये अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. 'यही है गुनहगार इसको मारो जुते चार', 'वारे मोदी तेरा गोल, मनुस्मृती का बजाया ढोल', असे फलक घेऊन सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्ते रस्ता अडवून बसले. त्यामुळे काही वेळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली व वाहतूक खोळंबली. यानंतर राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचार, मुंबईतील आंबेडकर भवनाचा मुद्दा मायावती यांनी संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपस्थित केले. परंतु, संसदेत दलित, आदिवासी समाजाचे १३१ सदस्य असतानादेखील या अन्यायाविरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही. बसप एकमेव पक्षाने दलितांवरील अत्याचारा विरुद्ध वारंवार आवाज उठवला. त्यास देशभरातून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन सरकारचे धाबे दणाणले आणि त्यातून चिडून बसप नेत्यांना भाजपकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप प्रदेश सचिव सागर डबरासे यांनी लावला. सरकारने सिंह यांना अटक करून गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्यावतीने देण्यात आला. आंदोलनात राज्याचे प्रभारी प्रेम रोडेकर, सरचिटणीस जितेंद्र मैस्कर, उत्तम शेवडे, नाना देवगडे, राजू बसवनाथे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, राजकुमार बोरकर, मोहन राईकवर, त्र्यंबक घरडे, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, मिलिंद बन्सोड, गौतम पाटील, संजय जयस्वाल, महेश सहारे, चन्द्रशेखर कांबळे, कविता लांडगे, आनंद सोमकुंवर, अभिषेक शंभरकर, मुरली मेश्राम यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>