Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

समिती गावात गेलीच नाही

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

तज्ज्ञांच्या समितीनेच कळमेश्वर तालुक्यातील बेल्लोरी आणि कुही तालुक्यातील तितूर येथे डम्पिंग यार्डचे आरक्षण दाखविले असले तरी पुन्हा सुनावणी घेणारी तज्ज्ञांची समिती या यार्डला भेट देणार आहे, असे तत्कालीन सभापती श्याम वर्धने यांनी सांगितले होते. मात्र, १० महिने होऊनही तज्ज्ञांची समिती या गावात गेलीच नाही. उलट डम्पिंग यार्ड त्याच गावांमध्ये कायम ठेवल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नागपूर सुधार प्रन्यासने प्रसिद्ध केलेल्या महानगर प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांनी आक्षेपांचा पाऊस पाडला. नागरिकांचे समाधान करण्यासाठी नासुप्रचे तत्कालीन सभापती श्याम वर्धने यांनी पुढाकार घेऊन जनसुनावणी घेतली. या सुनावणीला उपस्थित बेल्लोरी आणि कुही तालुक्यातील नागरिकांनी डम्पिंग यार्डला विरोध करत एकच गोंधळ घातला. नागरिकांना शांत करण्यासाठी वर्धने यांनी यार्डवर विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन देत समिती पुन्हा त्या गावांमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, समितीतील एकही सदस्य या गावात अद्याप जाऊनच न आल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.



गावकरी, संघटना आक्रमक आराखडा तयार करताना काही चुका झाल्याचे तत्कालीन सभापती श्याम वर्धने यांनी मान्य केले होते. आराखड्यात बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासनही वर्धने यांनी दिले होते. नागपूर मेट्रोरिजन आराखड्याच्या नियोजन समितीने याच जागेवर डम्पिंग यार्ड देण्याचे निश्चित केल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. 'मटा'ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. संत्रा, सोयाबीन, गहू, तूर, चना, कापूस आदी पिके या भागात घेतली जातात. या भागातील कुटुंबांचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो त्यामुळे या भागात डम्पिंग यार्ड नको, असे या भागातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जय जवान जय किसान संघटनेनेही आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे प्रशांत पवार, अरुण वनकर, संतोष विश्वकर्मा, विजयकुमार शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांची नुकतीच भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>