Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

कोळशातील लोह फुफ्फुसांना घातक

$
0
0




mandar.moroney@timesgroup.com

कोळसा खाणींमधील कामगारांना होणाऱ्या फुफ्फुसाच्या आजारामागे कोळशामधील लोह असण्याची शक्यता आता तपासून बघितली जाणार आहे. ही कारणे शोधण्यासाठी नागपुरातून संशोधनाला सुरुवात झाली असून, मध्य भारतातील कोळशांचे नमुने तपासून हा अभ्यास केला जाणार आहे.

प्रियद‌र्शिनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मायनर्स हेल्थ, सीम्स आणि वेस्टर्न कोलफिल्ड या नागपुरातील संस्थांच्यावतीने हे संशोधन केले जाणार आहे. कोळसा मंत्रालयाच्या माध्यमातून हा संशोधन प्रकल्प नागपुरातील संस्थांना देण्यात आला आहे.

मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत व त्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत असतात. कोळशाच्या भुकटीमुळे या कामगारांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. यातही अनेक कामगारांना फुप्फुसांचा आजार झालेला असतो. दर दहा कामगारांच्या मागे तीन जणांना फुफ्फुसाचा आजार असतो. कोळशामध्ये असलेल्या लोह या घटकामुळे असे आजार खाण कामगारांना होत असण्याची शक्यता आहे. लोहाबाबतची ही शक्यता तपासून बघण्यासाठी हे संशोधन पुढील अडीच वर्षांपर्यंत केले जाणार आहे.

--कोळशाचे नमुने जमा करणार

या संशोधनासाठी वेस्टर्न कोलफिल्डच्या मध्य भारतातील सर्व खाणींमधून कोळशाचे नमुने जमा केले जातील. ज्या नमुन्यांमध्ये लोहाचे प्रमाण आढळेल, असे नमुने वेगळे करून उंदरांवर प्रयोगशाळेत प्रयोग केले जातील, असे प्रियदर्शिनी इन्स्टिट्युटच्या बॉयोटेक्नॉलॉजी विभागातील प्राध्यापक व या प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. संविधान सुके यांनी सांग‌ितले. याशिवाय, स्टेम सेल कल्चर आणि टिश्यू कल्चरचा वापरही या संशोधनात केला जाणार आहे.

--देशातील पहिले संशोधन

कोळशातील लोह हे खाण कामगारांसाठी कितपत घातक आहे याचे भारतात आजवर ‌‌कोणतेही संशोधन झालेले नाही. पेनसिल्व्हेनिया येथे असे संशोधन झाले असून एकूण कामगारांपैकी २६ टक्के कामगार 'न्युमोकोनियॉसिस' या श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. याशिवाय, अमेरिकेतील उटाह आणि व्हर्जिनिया या दोन ठिकाणीदेखील कोळशातील लोहामुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन झाले आहे. भारतात मात्र असे कोणतेही संशोधन न झाल्याने कामगारांना होणारा फुफ्फुसांचा आजार आणि कोळशातील लोह यांचा संबंध प्रस्थापित करणारी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे, नागपुरात होणारे संशोधन हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच संशोधन राहणार असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मायनर्स हेल्थच्या संशोधक डॉ. शुभांगी पिंगळे यांनी सांगितले. प्रयोगशाळेतील परिणाम बघितल्यानंतर प्रत्यक्ष कामगारांवर संशोधन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>