Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

हवाईदलाचे ‘इंजिनीअरिंग’ नागपूरकडे

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

येथील मेंटेनन्स कमान मुख्यालयात उप कमान प्रमुख असलेले एअरमार्शल पी. पी. खांडेकर यांची मुख्यालयात हवाईदलाच्या इंजिन‌िअर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने हवाईदल वैमानिकांची खाण असलेल्या नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हवाईदलाच्या देशभरातील सामग्रींची देखभाल मेंटेनन्स कमानकडून केली जाते. मात्र, यासोबतच हवाईदल मुख्यालयातदेखील इंजिनिअर ‌विभाग असून त्याचे प्रमुख हे मेंटेनन्स कमानप्रमुख पदाइतकेच महत्त्वाचे असतात. हुद्द्यानुसार दोघेही थेट हवाईदल प्रमुखांच्याच अखत्यारित कार्य करतात. 'एअर ऑफिसर मेंटेनन्स' (एओएम) असे नाव असलेला हा मान आता एअरमार्शल खांडेकर या नागपूरकर अधिकाऱ्यांना मिळाला आहे.

एअरमार्शल खांडेकर हे नागपूरचे असून त्यांचे आई-वड‌िलांचे वास्तव्यही येथेच आहे. खांडेकर हे प्रतिष्ठेच्या विश्वेश्वरय्या प्रादेशिक इंजिनीअरिंग कॉलेजचे (आताचे व्हीएनआयटी) विद्यार्थी असून पदवीनंतर ते २५ जुलै १९७७ला हवाईदलाच्या एअरोनॉटीकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स) शाखेत अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी हवाईदलात सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. सुखोई-७, मिग-२३ आणि ‌मिग-२७ या रशियन बनावटीच्या अॅव्ह‌िऑनिक्समध्ये ते कुशल आहेत. त्यांनी तिन्ही दलांच्या एकात्मिक कमानमध्येही कार्य केले आहे. विविध कमानचे प्रमुख देखभाल अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पत्नी म‌नीषा खांडेकर यादेखील हवाईदल महिला ‌कल्याण संघटनेत (अॅफवा) स‌‌िक्रय आहेत.

आता एओएमपदी नियुक्ती झाल्यानंतर खांडेकर यांना प्रामुख्याने हवाईदलाच्या अपग्रेडेशनचे कार्य करावयाचे आहे. यासोबतच गाइडेड शस्त्रप्रणाली रडार, नवीन सामग्री ताफ्यात येणे व एकूणच सर्व सामग्रींचे आयुष्य वाढविण्यासाठी तंतोतंत देखभाल, यावर लक्ष केंद्र‌ित करावयाचे आहे.

मुख्यालयात सातवे नागपूरकर एअरमार्शल खांडेकर हे हवाईदल मुख्यालयात उच्चपदावर नियुक्त झालेले सातवे नागपूरकर ठरले आहेत. याआधी नागपूरने देशाला तीन हवाईदल प्रमुख दिले. यातील अनिल टिपणीस, फली मेजर आणि प्रदीप नाईक या तिघांचेही बालपण व शालेय शिक्षण नागपुरातीलच होते. त्यांच्या नियुक्तीनंतर दोन वर्षांपूर्वी उप हवाईदल प्रमुखपदी रविकांत शर्मा यांची नियुक्ती झाली होती. त्यांची सासूरवाडी सीताबर्डी येथील होती. तर, मेंटेनन्स कमानमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दत्तात्रेय पांडे हे मुख्यालयात एओईएम होते. जगातील सर्वात उंच हवाईतळावर विमान उतरविणारे शौर्यचक्र विजेते एअर कमोडोर सूर्यकांत चाफेकर हेदेखील हवाईदल मुख्यालयात आहेत. तर, आता एअरमार्शल खांडेकर हे या पदापर्यंत पोहचणारे पहिलेच नागपूरकर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>