या कामाचे प्रशस्तिपत्र ग्रामीण विकास विभागाने नागपूर जिल्हा परिषदेला दिले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्या प्रयत्नातून महिला बचत गट साकारण्यात आले आहेत. महिलांना घर आणि नोकरी दोन्हीकडे जबाबदारीने लक्ष द्यावे लागते. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात महिला बचतगटाचा मोलाचा वाटा असतो. बचतगट म्हणजे महिलांसाठी एकप्रकारे हक्काचे व्यासपीठच आहे. नवे रोजगाराचे दालन त्यांच्यासमोर उभे झाले आहे. कामठी तालुक्यातील प्रबुद्ध महिला बचत गटाने लाकडी साहित्य, तर लिहगाव येथील प्रगती महिला बचत गटाने लग्नासाठी मंडप डेकोरेशन, भांडी पुरविणे, लाउडस्पीकर देऊन १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळविले. मौदा तालुक्यातील दहाडी येथील प्रशिक महिला बचतगटाने फिनाइल आणि युरियाची विक्री करून ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील गुरुमाऊली महिला बचत गटाने बॅग तयार करून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले, पारशिवनी तालुक्यातील गुंढरीवांडे या गावातील छत्रपती महिला बचतगटाने अगरबत्तीचा व्यवसाय करून महिन्याला ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. भिवापूर तालुक्यातील हळद आणि मिरची पावडरचे उत्पादन घेऊन ६० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. महिलांना रोजगार देऊन स्वावलंबी केल्याची दखल ग्रामीण विकास विभागाने घेतली आहे. याबद्दल अंकुश केदार यांचे ग्रामीण विकास विभागाने कौतुक केले आहे.
मौदा अव्वल; पारशिवनी पिछाडीवर
मौदा तालुक्यात सर्वाधिक १ हजार १६३ गट आहेत. तर, नागपूर तालुक्यात ६१२, कामठी तालुक्यात ३१८, हिंगणा तालुक्यात ५५५, कळमेश्वर तालुक्यात ४९५, सावनेर तालुक्यात ५७८, काटोल तालुक्यात ४९५, नरखेड तालुक्यात ५४२, पारशिवनी तालुक्यात २९७, रामटेक तालुक्यात ६२८, कुही तालुक्यात ४९७, उमरेड तालुक्यात ५२७ गावे, भिवापूर तालुक्यात ४३३ महिला बचतगट तयार करण्यात आले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट