सोमवारी शहरातील एक मोठे कॉम्पलेक्स असलेल्या मंगळवार बाजाराचा मनपाच्या बाजार विभागाने आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही उपस्थित होते. या तपासणीत केवळ लीजधारक व दुकानदारांचाच आढावा घेण्यात आला. सोबतच मनपातर्फे देण्यात आलेल्या सुविधांचीही तपासणी करण्यात आली. परिसरातील वाढलेल्या अतिक्रमणावर नाराजीही व्यक्त करण्यात आली. मंगळवारी बाजारासोबतच कॉम्प्लेक्समध्येही प्रचंड अस्वच्छता आहे. अनेक जागांवर दुकानदारांनीही अतिक्रमण केले आहे.अवैध बांधकामही केले आहे. अशा अतिक्रमण करून बाधकाम करणाऱ्यांना हटविण्यात येईल. शिवाय, ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
कोट्यवधीचा महसूल थकला
मनपाला बाजार विभागाकडून ४.७९ कोटीचे उत्पन्न मिळते. यात दुकानांची भाडेरुपात ३.३० कोटीचा समावेश आहे.बाजारातील ओट्यांपासून ३८ लाख तसेच मोकळया जागांपासून १.१० कोटी तिजोरीत जमा होत आहे.लीज नूतनीकरण केल्यास मनपाच्या तिजोरीत पुन्हा २५ टक्के महसूल वाढ होऊ शकते. मनपाने एकूण ४७३८ जणांना दुकाने, ओटे व मोकळी जागा लीजवर दिली आहे. यातील केवळ १६३ जणांना दीर्घ मुदतीसाठी दुकाने लीजवर देण्यात आली आहेत. तर, इतरांना केवळ ११ महिन्यासाठी अस्थायी स्वरुपात लीज देण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट