Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

डिसेंबरमध्ये मेट्रो सुसाट; गडकरी यांची घोषणा

$
0
0

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

महा​पालिकेच्या येत्या निवडणुकीपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये उपराजधानीतील मेट्रोचा एक टप्पा पूर्ण होऊन सुसाट धावेल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

भाजप महिला मोर्चाच्या कार्यकारिणीच्या पदग्रहण प्रसंगी गडकरी बोलत होते. रेशीमबागेतील स्मृती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास शहरातील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामांची जंत्री उपस्थितांसमोर मांडली.

नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो रेल्वेचे कामाचा देशातील सर्वात वेगाने सुरू असलेल्या कामांमध्ये समावेश आहे. येत्या निवडणुकीपूर्वी एका मार्गावरून मेट्रो धावेल, त्या दिशेने आमचे प्रयत्न आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले, आऊटर रिंग रोडसाठी मेटल आणि प्लास्टिक काढलेल्या कचऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यानुसार हा प्रयोग यशस्वी ठरू शकतो.

नाग नदीची स्वच्छता केल्याने यावेळी नदीतील पाण्याचा त्रास झाला नाही. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने देशातील मॉडेल शहर म्हणून नागपूरचा विकास करण्यात येत आहे. जाहीरनाम्यानुसार करण्यात आलेल्या लेखाजोखा घरोघरी पोहचवण्यात येत आहे. शहरात सुरू असलेला चोविस तास पाणी पुरवठा, रस्त्यांची कामे, नागरी सोयी जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर पॅटर्न सांडपाण्यावर ​प्रक्रिया करून वीज निर्मितीचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर हा पॅटर्न देशभरात वापरण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल लवकरच धोरण जाहीर करतील, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>