Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

आज ठरणार नागपूरची ‘श्रावणक्वीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर
कलागुण, बुद्धिचातुर्याचा कस लावणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'श्रावणक्वीन' सौंदर्य स्पर्धेची प्रतीक्षा संपली आहे. गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिटी प्रीमिअर कॉलेज आणि एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंदुस्थान कॉलनी वर्धा रोड येथे ही स्पर्धा होणार आहे. सौंदर्यवतींनी पहिल्याच वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गुरुवारी नागपूरची श्रावणक्वीन कोण ठरणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

'मटा श्रावणक्वीन स्पर्धा' अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुण्या-मुंबईकडील युवतींच्या उड्या पडत असतात. श्रावणक्वीन स्पर्धेचे हे नागपुरातले पहिलेच वर्ष होते. तरीदेखील तरुणींनी अजिबात मागे न राहता भरघोस प्रतिसाद देत नावांची नोंदणी केली आणि रंगीबेरंगी वेशातील फोटो पोस्ट केले आहेत. नृत्य, नाट्य, वादन, गायन यांसारखे कलागुण असलेल्या या युवती गुरुवारी फॅशनच्या रॅम्पवर चालतीलच शिवाय, आपल्या कलेचे प्रदर्शनही करतील. त्यातील काहीजणी पहिल्यांदाच रॅम्पवर चढतील तर काहींनी कॉलेजमध्ये त्यांचा अनुभव घेतलेला असेलच. सर्व स्पर्धकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर सर्वजणी स्पर्धेविषयीच्या चर्चेत गुंतलेल्या आहेत. कोणता ड्रेस घालायचा, त्यावर मॅचिंग ज्वेलरी कोणती असावी, काय सादर करायचे, रॅम्पवर कसे चालायचे असे अनेक प्रश्न या सर्व सौंदर्यवती वॉट्सअॅपवरून एकमेकींना विचारून शंकांचे समाधान करीत आहेत. गुरुवारी या स्पर्धेची पहिली फेरी होणार आहे. यात विविध राउंड होतील. परीक्षक सर्व स्पर्धकांचे परीक्षण करतील व नागपूर श्रावणक्वीन, फर्स्ट रनरअप आणि सेकंड रनरअपची निवड करतील. प्राथमिक फेरीत निवडल्या गेलेल्या उत्कृष्ट स्पर्धकाचे ग्रुमिंग सेशन मुंबईला होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांचे मोलाचे मार्गदर्शन या सेशनमध्ये त्यांना लाभेल. अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तरुणीच्या डोक्यावर 'श्रावणक्वीन'चा झळाळता मुकुट सजवला जाईल.

लक्षात घ्या...

केव्हा : गुरुवार, ११ ऑगस्ट

कधी : सकाळी ११ वाजता

व्हेन्यू पार्टनर

नारायणी मेमोरियल सभागृह, सिटी प्रीमिअर कॉलेज आणि एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, ‌हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर.

स्पर्धेचे नियम

■ स्पर्धेत १८ ते २५ वयोगटातील तरुणींनाच प्रवेश. ■ ऐनवेळी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणी केलेल्या स्पर्धेकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. ■ 'मटा श्रावणक्वीन' हे अत्यंत प्रतिष्ठेचे व्यासपीठ असून, युवतींनी या स्पर्धेला अतिशय गंभीरपणे घ्यावे. ■ परफॉर्मन्स सादर करण्यापूर्वी स्पर्धकांना कॅटवॉक करावा लागेल. ■ रॅम्प वॉक केल्यानंतर स्पर्धकाला एका मिनिटात स्वतःची ओळख करून द्यायची आहे. ■ नृत्य, अभिनय, गायन किंवा अन्य एखाद्या कलेत तुम्ही पारंगत असणे अपेक्षित असून, परफॉर्मन्स सादर करण्याकरिता दोन मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ■ परफॉर्मन्सला साजेसा पेहराव स्पर्धेकांना स्वतःच्या खर्चाने करायचा आहे. ■ पेहराव आणि मेकअपची तयारीदेखील स्पर्धकांना स्वतः करायची असून, हॉलवर त्याची व्यवस्था होणार नाही. ■ परफॉर्मन्सनंतर सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारले जातील. ■ ‌फायनल आणि ग्रूमिंग सेशनसाठी फॅशन रॅम्पवर आवश्यक असणारे वेस्टर्न स्टाइल कपडे घालावे लागतील. ■ एलिमिनेशन राउंडमधून निवड झालेल्या तरुणींसाठी खास ग्रूमिंग सेशन घेतले जाईल. ग्रूमिंग सेशनला उपस्थित राहाणे बंधनकारक आहे. ■ ग्रूमिंग सेशन मुंबईला होणार असून, या दहा दिवसांचा राहण्याचा खर्च स्पर्धकांना करायचा आहे. ■ यापूर्वीच्या 'श्रावणक्वीन' स्पर्धेतील ग्रूमिंग सेशनमध्ये सहभागी झालेल्या तरुणींना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. ■ परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

फेसबुक पेज : www.facebook.com/mtshravanqueen ,

फेसबुक पेज : www.facebook.com/mtshravanqueen ,

ट्विटर पेज : #mtshravanqueen2016

इमेल - mtshravanqueen@gmail.com

मोबाइल व दूरध्वनी : ९८२३६१२२२०, ८८५६०२६६४९, ०२२-२२७३५४५९ आणि ०२२-२२७३५४६० या क्रमांकांवर सकाळी १० ते ५ या वेळेत संपर्क साधावा.

व्होट द्या!

यात 'मटा' वाचकांचाही सहभाग राहणार असून, आवडत्या स्पर्धकाला पसंतीचे व्होट देण्याची सुविधा राहणार आहे. वाचकांनी www.mtshravanqueen.com या वेबसाइटवरून आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत द्यायचे आहे.

■ स्पर्धा प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बंद झाली असून, यापुढे कुणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

'मटा'ने तरुणींसाठी आयोजित केलेल्या या 'श्रावणक्वीन' सौंदर्य स्पर्धेमुळे तरुणींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. अशा सौंदर्य स्पर्धा स्वयंविकासासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नागपुरातील सर्व तरुणींना माझ्याकडून खूप शुभेच्छा !

- लोपामुद्रा राऊत (नागपूर), मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles