Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

नेत्रपटल; रिलायन्सची मदत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर
दृष्टी गेल्याने देशात आजघडीला १० लाख लोक जगण्याची उमेदच हरवून बसले आहेत. त्यांना नव्याने जीवन दाखविण्यासाठी नेत्रदान चळवळ गतिमान करणे आवश्यक आहे. दर दिवसाला मृत्यू पावणाऱ्यांनी नेत्रदान केल्यास अवघ्या महिना-दोन महिन्यांत सर्व दृष्टिहिनांना जग बघण्याची संधी मिळेल. नेत्रदानाचा हा उदात्त हेतू ठेवत मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत्रपटल प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी सरकार विचार करीत आहे.

या केंद्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिलायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पत्र पाठवले आहे. रिलायन्सने या केंद्रासाठी सहकार्य करावे, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. दृष्टिहीन बांधवांना सृष्टी दिसावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांच्याद्वारे उत्तम कार्य सुरू आहे. दरवर्षी ८० अंध व्यक्तींच्या डोळ्यात उजेड पेरण्याचे काम होत आहे. नेत्ररोग विभागात नेत्रपटलांवरील उपचारासाठी महाराष्ट्रासह तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथील रुग्ण येतात. गरीब रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरत आहे. मात्र, सुपरमध्ये नेत्रपटलावरील उपचारपद्धतीचा अभाव आहे. नेत्रपटल प्रत्यारोपण केंद्र सुपरमध्ये तयार झाल्यास अधिकाधिक रुग्णांना फायदा होईल, या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिलायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सुपरमध्ये नेत्रपटल प्रत्यारोपण केंद्र तयार करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. रिलायन्सने आतापर्यंत शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले असून, त्यात भर म्हणून सुपरमध्ये नेत्रपटल प्रत्यारोपण केंद्र असणार आहे. राज्यसरकारतर्फे मदत करण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटीत सध्या न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, न्यूरोलॉजी, युरोलॉजीतील उपचार उपलब्ध आहेत. नेत्ररोगावरील अत्याधुनिक उपचार सुरू करण्याच्या हेतूने सुपरमध्ये नेत्रपटल प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव रिलायन्सच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत सुरू होऊ शकतो. हे केंद्र सुरू झाल्यास सुपरच्या उपचार यंत्रणेत भर पडेल. या केंद्राचा लाभ मध्यभारतातील रुग्णांना होईल, असे सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>