गत आठवड्यात एका तरुणीच्या मदतीने आवळे व त्याच्या टोळीने अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन रेल्वे कर्मचाऱ्याकडून तीन लाख ७० हजार रुपयांची खंडणी उकळली होती. या प्रकरणात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून दोन महिलांसह तिघांना अटक केली होती, तर आवळे हा फरार झाला होता. ६ मे रोजी आवळे व त्याच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणातही तो मानकापूर पोलिसांना हवा होता. पोलिस उपायुक्त संजय लाटकर, सहायक पोलिस आयुक्त आर. डी. तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एन. भटकर, पोलिस उपनिरीक्षक के. डी. भगत, त्यांचे सहकारी संतोष राठोड, अंकुश राठोड, राजेश वरठी, दिनेश वरकुंडे व ज्ञानेश्वर यांचे पथक दीपक आवळे याचा शोध घेत होते. तो लाव्हा भागात असल्याची माहिती मानकापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून त्याला अटक केली. गुरुवार, १२ मे रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
औरंगाबाद, वर्ध्यात वास्तव्य मानकापूर पोलिसांनी ५ मे रोजी आवळे व त्याच्या टोळीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो पसार झाला होता. काही दिवस तो नरसाळा भागात राहिला तेथून तो सावनेर, औरंगाबाद व वर्ध्यात वास्तव्याला होता. बुधवारी तो लाव्हा भागात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट