Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

‘रामदेवबाबा आयुर्वेदिक संस्कृतीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

पतंजलीचे प्रमुख योगगुरू रामदेवबाबा स्वदेशी, आयुर्वेदिक संस्कृतीचे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे विदेशात जाणारे चलन बाहेर जाणार नाही, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर गणरायाची स्थापना करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बहुराष्ट्रीय कंपन्या देशातील ७० हजार कोटी रुपयांची विदेशी पुंजी नेते. आपल्याकडे साधन संपत्ती असताना विदेशी मुद्रा द्यावी लागत असल्याचा फटका ​आर्थिक विकासाला बसतो. बाबांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे विदेशी चलन बाहेर जाणार नाही, उलट जगातील चलन भारतात येईल, असा दावाही त्यांनी केला.

रामदेवबाबा यांच्या फूड पार्कचे भूमिपूजन येत्या १० सप्टेंबरला नागपुरात होणार आहे. राज्यातील ८० टक्के वन विदर्भात असून त्यातही वन औषध व आयुर्वेदिक जडीबुटीचे प्रमाण अधिक आहे. पतंजलीच्यावतीने फूड पार्कमध्ये आयुर्वेद औषध, ज्युस आणि इतर वस्तूंचे उत्पादन करण्यात येईल. विदर्भातील वनसंपदेचा उपयोग करून या भव्य प्लांटमध्ये २० हजार तरुणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या शेतमालालाही मागणी राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मदत होईल, असे विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles