रिलायन्सचे देशात आठ ठिकाणी डेटा सेंटर्स आहेत. यात प्रामुख्याने नागपूर, मुंबई आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे रिलायन्सच्या जीओचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा सेंटर आहे. आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि डेटाचे सर्व नियंत्रण हे मुंबई येथील केंद्रात होते. तर देशांतर्गत कॉल्स आणि डेटाचे नियंत्रण मौद्यात होते. डेटा सेंटरला सहसा कम्प्युटर सिस्टीम आणि त्याच्याशी संबंधित बाबींवर काम केले जाते. यात टेलिकम्युनिकेशन आणि डेटा स्टोअरेज सिस्टीम यांचा समावेश असतो. वीजपुरवठा खंडित विविध बाबींची बॅक अपप्रणाली डेटा सेंटरद्वारे नियंत्रित केली जाते. या प्रकारच्या सेंटरला लागणारा वीजपुरवठा हा एखाद्या छोट्या शहराला लागणाऱ्या विजेइतकाही असू शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट