नागपूर विभाग एक अंतर्गत असलेल्या मौदा उपविभागाअंतर्गत महालगाव वितरण केंद्राचे विभाजन करून गुमथळा वितरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे महालगाव वितरण केंद्राचे नाव महालगावऐवजी कापसी वितरण केंद्र करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामठी शाखा कार्यालयाअंतर्गत अजनी, गादा, नीरी, उनगाव व येरखेडा शाखा कार्यालयाअंतर्गत घोरपड ही पाच गावे काढून नवीन गुमथळा शाखा कार्यालयाला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे नव्या पदाच्या निर्मितींमध्ये सहाय्यक अभियंता वितरण १, प्रधान तंत्रज्ञ २, वरिष्ठ तंत्रज्ञ ६, तंत्रज्ञ ८ व कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक १ पद असे १९ पदे मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी तंत्रज्ञ फक्त तीनच होते. त्यात सहा पदांची वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर कापसी वितरण केंद्राच्या आस्थापनेवर अतिरिक्त होणारे वरिष्ठ तंत्रज्ञाचे एक पद व तंत्रज्ञाची २ पदे नवीन गुमथळा वितरण केंद्राच्या आस्थापनेवर वळवण्यात येणार आहे. विभाजनानंतर कापसी वितरण केंद्रात सहाय्यक अभियंता १, प्रधान तंत्रज्ञ १, वरिष्ठ तंत्रज्ञ ७, तंत्रज्ञ ३ असे एकूण १२ पदे मंजूर आहेत. गुमथळा वितरण केंद्रात सहाय्यक अभियंता १ पद, प्रधान तंत्रज्ञ १, वरिष्ठ तंत्रज्ञ ७, तंत्रज्ञ ३ अशी १२ पदे मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट