Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

..तर दत्तक घेणाऱ्यांवरही कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मुलं जन्माला येणे ही कुटुंबातील सर्वांत आनंदाची बाब. मात्र, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुख येत नाही. वैद्यकीय कारणांमुळे अनेकांना या सुखापासून वंचित राहावे लागते. अशा जोडप्यांसाठी मुले दत्तक घेणे हा पर्याय आहे. मात्र, मुले दत्तक घेण्यासाठी काही नियमही आहेत, याची माहितीच अनेक कुटुंबांना नसल्याने या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची बाब पुढे आली आहे. नियमांना डावलून मुले दत्तक घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता जिल्हा बालसंरक्षण कक्षाने मोहीम सुरू केली आहे.

मुले दत्तक घेताना गैरप्रकार होऊ नये म्हणून बालसंरक्षण अधिनियमानुसार पालकांना एका प्रक्रियेतून जावे लागते. बालसंरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ८०/८१ अंतर्गत मुलांना दत्तक घेण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मुलांना दत्तक घेण्याचे नियमही ठरले आहेत. मुलांना दत्तक घेण्यासाठी बालसंरक्षण अधिनियम २०१५ नुसार कठोर नियम असतानाही अनेक सामाजिक संस्थांकडूनच, पालकांकडून उल्लंघन होत असल्याचे पुढे आले आहे.

'त्या' पालकांचा शोध

www.cara.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून मुलांना दत्तक घेता येते. या प्रक्रियेचे ज्यांनी पालन केले नाही, अशा पालकांचा शोध जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडून घेतला जात आहे. या पालकांवर कारवाई करून त्यांच्या तावडीतील मुलांची सुटका करणे, हा यामागचा उद्देश आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी सांगितले.

शॉर्टकटचे धोके

मुलांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांचे बालपण टिकून राहावे, यासाठी या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांना मुले नाही, ते आपल्या नातेवाइकांचे किंवा एखाद्या गरीब घरातून मुले दत्तक घेतात. मुले दत्तक घेण्याचा हा मार्ग सोपा असला तरी बालसंरक्षणाच्या दृष्टीने यात अनेक धोके आहेत. कुणाचेही बंधन नसल्याने दत्तक घेतलेल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकते. वाईट उद्देशांनीही मुले दत्तक घेण्याचे प्रकार घडू शकतात. मुलांना घरकामासाठी राबविणे, त्यांच्यावर अत्याचार करणे असे धोके आहेत. या धोक्यांपासून मुलांना वाचविण्यासाठी दत्तक घेण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>