पेसा, वनहक्क अंमलबजावणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, अनुषंगिक विषय, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वनउपजीविका यासाठी हा निधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत विविध शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण प्रणाली अंमलात आणली जात आहे. यामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण दिले जाते.
नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत रामटेक हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी क्षेत्रातील गावांमधील शाळांसोबतच आश्रमशाळांनाही ई-लर्निंगद्वारे जोडण्यात येणार आहे. पहिल्यांदा हा प्रयोग हाती घेण्यात आला असला तरी यावर देखरेख कशी करण्यात येईल, यावर अजूनही निर्णय झाला नसल्याचे कळते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट