Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

टाउन हॉलसाठी २१.७० कोटी

$
0
0

म.टा.प्रतिनिधी,नागपूर

जरीपटका येथे टाउन हॉलसाठी ३५७० चौ. मी. जागेच्या भूसंपादनासाठी मनपा २१.७० कोटी मोजणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरक्षित जागा व पट्टेधारकासोबतच उपलब्ध मोकळी जागाही भूसंपादित करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या २२ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत या जागेच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे.

जरीपटका, सिटी सर्व्हे २०८७/२, नझुल भूखंड क्र. ०५ येथील जमीन क्षेत्र शहर विकास योजनेत 'टाउन हॉल'साठी आरक्षित आहे. येथील उर्वरित इतर जागा संपादित करण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये या टाउन हॉलचे आरक्षण आहे. येथील आरक्षणासोबतच एकूण क्षेत्र ६१४४ चौ. मी. एवढे आहे. या आरक्षित जमीन क्षेत्रावर पूर्व मंजूर बांधकामे व न्यायालयाच्या आदेशानुसार व्यपगत जागा वगळता आरक्षण विकसित करण्यासाठी ३५७० चौ. मी. एवढी जागा उपलब्ध आहे. या जागेची खरेदी किंमत २१ कोटी ७० लाख ६१ हजार १६५ एवढी आहे. ही जागा संपादित करण्यासाठी १० जून, २०१६ मध्ये मुख्य अभियंत्याच्या अ​ध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला. त्याप्रमाणे ३५७० चौ.मी. जागेवर साधारणत: २५० व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था होवू शकते.

एवढी जागा टाउन हॉल निर्मितीकरिता पुरेशी व योग्य आहे. या जागेला १२ मीटरचा थेट रस्ताही उपलब्ध आहे. संपादित करावयाच्या जमिनीवर पट्टेधारक नगीना हकीमुद्दीन अकोलावाला (हिराणी) व इतर एक यांच्या नझूल भूखंड क्र. ५/१ पैकी ८४६ चौ.मी क्षेत्र जागेचाही खरेदीचा विचार आहे. यासाठीही ५ कोटी १४ लाख २३ हजार ८०५ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे पट्टेधारक व मंजूर बांधकामे वगळून इतर अशा एकूण ३५७० चौ.मी. जागेसाठी २१.७० कोटी निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>