Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

आश‌िष देशमुख हे लाटेतील लॉटरी

$
0
0

नागपूर : काँग्रेस विरोधी लाटेत म्हणजेच मोदी लाटेत राज्यातील अनेकांना लॉटरी लागली आहे. भाजपचे आमदार आश‌िष देशमुख हेसुद्धा त्यातीलच एक आहेत. लाटेत लॉटरी लागलेल्या राज ठाकरेंना निवडणुकीत आव्हान उेण्याची भाषा करू नये. इतकीच खुमखुमी असेल तर ताबडतोब राजीनामा द्यावा आणि काटोलमधून विदर्भवादी म्हणून निवडणुकीत उभे राहावे, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिले आहे.

'बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी सर्वसामान्यांना राजकारणात आणून त्यांना लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. स्वतः कधीही पदाची अभिलाषा बाळगली नाही किंवा कधी कोणते पदही हस्तगत केले नाही. याउलट आश‌िष देशमुखांच्या वड‌िलांनी मंत्र‌िपद उपभोगले आहे. त्यांचे काका तर तब्बल दोन दशक लाल दिव्याच्या गाडीत फिरत होते. इतके असुनसुद्धा एकही विकासाचे काम देशमुखांना करता आले नाही. अशांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याची भाषा करू नये. यापुढे त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध विधान करू नये, अन्यथा वेळप्रसंगी घरात घुसूनसुद्धा त्यांचा समाचार घेतला जाईल', अशा शब्दांत गडकरी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांना इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>