तूरडाळीची साठेबाजी केल्याप्रकरणी मुंबईत जप्त करण्यात आलेली १० हजार क्विंटल तूरडाळ नागपूरकरांसाठी उपलब्ध होणार आहे. रविवार, १५ मेपासून शहरातील २४ आणि ग्रामीणमधील पाच केंद्रांवर अवघ्या १०० रुपये किलो या दराने डाळीची विक्री करण्यात येणार आहे. सध्या बाजारात तूरडाळीचे दर १३० ते १४० रुपये किलो सुरू आहे.
मुंबईतील एडलवेल्स कमोडिटी सर्व्हिस लि. यांच्याकडून १० हजार क्विंटल तूरडाळ शासनाने जप्त केली होती. २४ नोव्हेंबर २०१५ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार, या तुरडाळीची विक्री १०० रुपये किलो दराने करण्याच्या अटीवर ही डाळ व्यापाऱ्यांना परत करण्यात आली. यासाठी प्रतिज्ञापत्रही भरून घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना कोणत्याही बाजारात ही डाळ विकण्याची मुभा आहे. नागपुरात ही डाळ विकण्याचा निर्णय संबंधित व्यापाऱ्याने घेतला असून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार आता ही डाळ नागपुरात रविवारपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिव्यक्ती पाच किलो तूरडाळ मिळणार आहे. शहरात २४ ठिकाणी आणि ग्रामीणमध्ये काटोल, कामठी येथे आणि रामटेक तालुक्यातील भंडारबोडी आणि मनसर येथे तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
इथे मिळेल तूरडाळ (शहर) सीताबर्डी : अपना भंडार
निर्मलानगर : अपना भंडार
अंबाझरी : अपना भंडार
बुटीबोरी इंडस्ट्रिज : अपना भंडार
फ्रेण्ड्स कॉलनी : अपना भंडार
दत्तात्रयनगर : अपना भंडार
सोमलवाडा : अपना भंडार
जयप्रकाशनगर : अपना भंडार
सदर : महेश्चंद्र अग्रवाल, रितेश ट्रेडींग कंपनी
मोहननगर : प्रकाश प्रोव्हीजन
हनुमाननगर चौकोनी कॉलनी : शिव धान्य भंडार
पंचशीलनगर : प्रियंका धान्य भंडार
अग्रवाल बिल्डींग, रविनगर : डी. एम. अग्रवाल यांचे दुकान
हेमू कॉलनी : भारती इंटरप्रायजेस, संगम कंझूमर्स
गड्डीगोदाम, कामठी रोड : श्याम किराणा स्टोअर्स
आहुजानगर, जरिपटका : कंवरराम कंझूमर्स को. ऑप सोसायटी
वॉर्ड क्रमांक १४ : माता बंब्लेश्वरी दुकान
वॉर्ड क्रमांक २१ : न्यू सुभाष दुकान
वॉर्ड क्रमांक १५ : नवयुवक ग्रा. सह. संस्था
वॉर्ड क्रमांक २२ : सप्तरंग ग्रा. सह. संस्था
हावरापेठ, वॉर्ड क्रमांक १४ : मेघा धान्य भंडार
आहुजानगर, वॉर्ड क्रमांक ५७ : मागासवर्गीय ग्राहक सहकारी संस्था
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट