Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

​ करचोरी कराल तर, आणखी अडकाल

$
0
0



म.टा. प्रतिनिधी, नागपूर

‘जीएसटी आल्यानंतर सर्व कर प्रणाली ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे कराची चोरी करू नका. एक चोरी लपवण्यासाठी १०० ठिकाणी खोटे बोलावे लागेल. कराची चोरी कराल तर आणखी अडकाल’, असा सज्जड इशारा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यापाऱ्यांना दिला.

राज्याच्या महसुलात महत्त्वाची भूमिका राबविलेल्या विक्री कराचा स्थापना दिन अर्थात विक्री कर दिन शनिवार, १ ऑक्टोबरला होता. विभागीय स्तरावरील हा दिन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नितीन गडकरींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्‍यक्षस्थानी होते. खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, क्रिकेटर-उद्योजक प्रशांत वैद्य व विक्री कर आयुक्र पुनमचंद अग्रवाल मंचावर होते.

गडकरींनी यावेळी व्यापाऱ्यांना पारदर्शक व्यापार करण्यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांनाही दम ‌दिला. ‘काहीच निर्णय न घेता फाइल दाबून ठेवणारे किंवा थेट वर पाठविणारे अधिकारीदेखील अनेक आहेत. अधिकाऱ्यांच्या या मानसिकतेमुळेच करदाता कर द्यायला घाबरतो. विक्री कर विभागाचे काम चांगले असले तरी करदात्यांना नाहक झटके देणारे अधिकारीही आहेत. अशा सर्वच अधिकाऱ्यांना तीन दिवसांत फाइल क्लिअर करण्याचे आदेश द्या. तीन दिवसांत अधिकारी निर्णय घेत नसल्यास त्यांना घरी पाठवा. एकूणच सर्व कर प्रणाली ऑनलाइन होत आहे. त्याचा लाभ विभागाने घेऊन तो करदात्यांपर्यंत पोहोचवावा. विकास आणि ई-गव्हर्नन्स यांची सांगड घालावी’, असे गडकरी म्हणाले. पायाभूत सुविधांच्या ‌विकासामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटची खरेदी रस्ते वाहतूक मंत्रालय करणार आहे. याअंतर्गत आपल्या मंत्रालयाचे ३० कंपन्यांच्या ११७ फॅक्टरींशी २८५ लाख टन सिमेंटचा पुरवठा करण्यासंबंधी करार केला आहे. त्यांचा दर १२० ते १४० रुपये प्रती पोती आहे. या माध्यमातून चांगला विक्री कर मिळेल, असेही गडकरींनी यावेळी सांगितले.शून्य टक्के कर चुकवेगिरी प्राप्त करणारा नागपूर विभाग हा राज्यातील पहिला ‌विभाग असल्याची माहिती पुनमचंद अग्रवाल यांनी प्रास्ताविकात दिली. चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्हास्तरावरील तीन व विभागीय स्तरावरील पाच करदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच शून्य टक्के कर चुकव‌ेगिरी प्रमाण प्राप्त करण्यात मोलाची कामगिरी करणारे विक्रीकर उपायुक्त विनोद गवई यांच्यासह पाच अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विभागातील अधिकारी, करदाते आदी यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या दिनाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>