मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
उमरेड-कारंडला अभयारण्यामधून १८ एप्रिलला बेपत्ता झालेल्या आशियातील सर्वात मोठ्या जय वाघाची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वन्यजीव संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनाला दिली आहे.
उमरेड अभयारण्यातील जय हा वाघ एप्रिलमध्ये बेपत्ता असल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाची झोप उडाली होती. त्याला शोधण्यासाठी १०० हून अधिक स्वयंसेवक कामाला लागले होते. त्यांनी अभयारण्याचा परिसर पिंजून काढला. ऑगस्टच्या अखेरीस या अभयारण्यातच एका वाघाचे केस सापडले होते. ते 'जय'चेच आहेत, असं निष्पन्न झालं आहे. जय १६ जुलैपर्यंत जिवंत होता, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट