Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

ब्राऊन शुगर तस्कराला अटक

$
0
0


नागपूर : हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान वाहतूक शाखा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अमलीपदार्थ तस्कराला अटक केली. त्याचा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी अटकेतील युवकाकडून सुमारे १५०ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली. शुभम संजय काळे (वय २२ रा.रामनगर,चंद्रपूर), असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

दक्षिण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमर गायधने, सहायक उपनिरीक्षक ठाकरे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप वाघ, बाळू चव्हाण, शिपाई राजेश चौहान,पंकज बोराडे, महेश,जयेश, ज्ञानेश्वर कोठे व मंगेश वर्धा मार्गावरील कार्गो वळणावर हेल्मेट न घालणाऱ्या मोटरसायकल चालकांविरुद्ध कारवाई करीत होते. याचवेळी शुभम व त्याचा साथीदार मोटरसायकलने ( एमएच-३४-एटी- ४९९ ) हॉटेल प्राईडकडून खापरीकडे जात होते. हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. ते पळताच पोलिसांनी पाठलाग करून शुभमला पकडले. त्याच्याकडे सुमारे १५० ग्रॅम ब्राऊन शुगर आढळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>